सावरकर नगरमध्ये इमारतीत आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाण्याच्या सावरकर नगरमधील साई सुदर्शन सोसायटीच्या मीटर बॉक्स रूममध्ये गुरुवारी (ता. १३) आग लागली. या घटनेत त्या मीटर रूममधील तब्बल १० मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत. सावरकर नगर म्हाडा वसाहतीत आग लागल्याची माहिती संदीप चव्हाण नामक नागरिकाने महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी, आपत्ती व्यवस्थापन आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटात ही आग नियंत्रणात आली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसली तरी, तेथील १० मीटर बॉक्स जळून नुकसान झाले आहे.