कोकणातील मोहक तारकर्ली समुद्रकिनारा! स्कूबा डायव्हिंग, डॉल्फिन दर्शनाचाही घ्या आनंद
esakal November 16, 2025 07:45 AM

Tarkarli Beach, Konkan

कोकण

महाराष्ट्रात असलेला कोकण भाग पर्यटकांना अनेकदा भूरळ घालतो, त्यातही तेथील समुद्रकिनारे निसर्गसौदर्याने नटलेले आहेत.

Tarkarli Beach, Konkan

तारकर्ली समुद्रकिनारा

असाच एक समुद्रकिनारा म्हणजे तारकर्ली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून अगदी सात किलोमीटरवर तारकर्ली आहे.

Tarkarli Beach, Konkan

अद्भूत निसर्ग सौंदर्य

स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आणि खाडी यांच्या संगमामुळे येथे अद्भूत निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो.

Tarkarli Beach, Konkan

उत्तम कालावधी?

तारकर्ली समुद्रकिनारा हा कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळही आहे. उन्हाळा आणि हिवाळा येथे भेट देण्यासाठी उत्तम कालावधी आहे.

Tarkarli Beach, Konkan

वॉटर स्पोर्ट्स

तारकर्लीमध्ये पर्यटकांना वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेता येतो. तसेच बॅकवॉटर सफारीचाही आनंद येथे घेता येतो. सुरूचे बन देखील आकर्षणाचे केंद्र आहे.

Tarkarli Beach, Konkan

डॉल्फिन अन् सीगल पक्ष्यांचे दर्शन

कर्ली नदी, समुद्र सफारीमध्ये डॉल्फिन दर्शनही अनेकदा घडते. तसेच सीगल पक्ष्यांचे थवे पाहण्याचाही आनंद येथे घेता येतो. सुनामी पाँइंट हे येथील वैशिष्ट्य आहे.

Tarkarli Beach, Konkan

स्कूबा डायव्हिंग सेंटर

याशिवाय पर्यटन स्थळापासून काही अंतरावरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग सेंटरही आहे.

Tarkarli Beach, Konkan

वाहतूक व्यवस्था

तारकर्लीला जाण्यासाठी विविध वाहतूक व्यवस्था आहे. मालवणहून स्थानिक वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध होऊ शकते.

Kudal Raiway Station

जवळची स्थानकं

तारकर्लीला जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक कुडाळ आहे, तर जवळचे बसस्थानक मालवण आहे. याशिवाय जवळचे विमानतळ सिंधुदुर्ग आणि गोवा आहे.

Tarkarli Beach, Konkan

पर्यटकांसाठी विशेष सुचना

पर्यटन स्थळासमोरील समुद्र अत्यंत धोकादायक असल्याने खोलवर जाऊ नये, तसेच खोलीचा अंदाज येत नसल्याने धाडस करू नये व सुचनांचे पालन करावे.

Kunkeshwar Temple in Sindhudurg

Konkan Tourism: कोकणाची दक्षिण काशी: श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.