बालदिन 2025 : “प्रत्येक बालदिन आपल्याला ही जाणीव करून देतो की आपण जपलेली स्वप्ने सुरक्षित ठेवणे हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे.” श्री राकेश जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स बालदिन हा आनंद, क्षमता आणि निरागसतेचा उत्सव आहे. पण या उत्सवामागे एक महत्त्वाचा प्रश्न दडलेला आहे. आपल्या मुलांना सक्षमपणे वाढता यावे, यासाठी आपण पुरेशा सुरक्षिततेची उभारणी करत आहोत का? भारतात एकूण लोकसंख्येपैकी चतुर्थांश नागरिक 14 वर्षांखालील असल्याने आपले भविष्य तरुण आहे. मात्र, या लोकसंख्यात्मक सामर्थ्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत तयारीची जोड मिळाल्यास त्याची खरी क्षमता उजागर होऊ शकते.
भारताचे आर्थिक परिदृश्य वेगाने बदलत आहे. 2020–21 मधील सुमारे ₹3.2 लाख कोटींच्या तुलनेत देशाचा एकूण आरोग्य खर्च 2024–25 मध्ये ₹6.1 लाख कोटींवर पोहोचून दुपटीहून अधिक वाढला आहे. तरीदेखील, कुटुंबांना आरोग्यखर्चाचा मोठा भार स्वतःच उचलावा लागत आहे. 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नॅशनल हेल्थ अकाउंट्सच्या आकडेवारीनुसार, एकूण आरोग्य खर्चापैकी सुमारे 39.4% खर्च हा ‘आउट-ऑफ-पॉकेट’ म्हणजेच वैयक्तिक खर्च आहे. एका वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे वर्षानुवर्षे केलेली बचत कोलमडू शकते आणि अनेकदा कुटुंबांना शिक्षण किंवा इतर आवश्यक गरजांमध्ये तडजोड करावी लागते. ज्या मुलांच्या भविष्याचा पाया असतात.
शिक्षणाचा वाढता खर्च ही आणखी एक मोठी चिंता आहे. भारतातील शिक्षण महागाई दर 10-12% च्या आसपास असल्याने उच्च शिक्षणाचा खर्च आठ ते दहा वर्षांत दुप्पट होत आहे. आज जो चार वर्षांचा अभ्यासक्रम ₹10 लाखांमध्ये पूर्ण होतो, तो 2035 पर्यंत ₹20-22 लाखांपर्यंत वाढू शकतो. वाढती जीवनशैलीची किंमत आणि आर्थिक अनिश्चितता लक्षात घेतली तर, कुटुंबांनी आर्थिक संरक्षणाला प्राधान्य देणे अधिकाधिक महत्त्वाचे बनले आहे.
भारताचा विमा प्रवेशदर मात्र अद्याप कमीच आहे. विमा नियामक प्राधिकरण (IRDAI) च्या अहवालानुसार देशातील एकूण विमा प्रवेशदर GDP च्या केवळ 3.7% असून, नॉन-लाइफ विमा फक्त 1% आहे. हा मोठा संरक्षण-अभाव अनेक कुटुंबांना, आणि त्यांच्याबरोबरच मुलांना, आर्थिकदृष्ट्या असुरक्षित ठेवतो. जागरूकता वाढत असली आणि नवनवीन विमा उत्पादने उपलब्ध असली तरीही अनेक भारतीय कुटुंबे विम्याला अजूनही ‘पर्यायी’ म्हणूनच पाहतात.
कुटुंब आर्थिकदृष्ट्या संरक्षित असेल तर मुलांनाही भावनिक सुरक्षितता मिळते. कुटुंबासाठीचा हेल्थ फ्लोटर प्लॅन दर्जेदार आरोग्यसेवा अबाधित ठेवतो. टर्म प्लॅन किंवा उत्पन्न संरक्षण योजना कमावत्या व्यक्तीला काही अनपेक्षित प्रसंग आल्यास मुलांचे शिक्षण आणि जीवनमान सुरक्षित ठेवते. घर विमा जो भारतातील 1% पेक्षा कमी कुटुंबांकडे आहे. केवळ मालमत्तेचेच संरक्षण करत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या स्थैर्याचे रक्षण करतो. ही विमा उत्पादने केवळ आर्थिक साधने नाहीत; ती सातत्य, स्थिरता आणि सुरक्षिततेची हमी देतात.
यामध्ये फक्त कुटुंबांचीच नव्हे तर विमा उद्योगाचीही मोठी जबाबदारी आहे. विविध सामाजिक-आर्थिक गटांसाठी संरक्षण अधिक सुलभ, परवडणारे आणि उपयुक्त बनवणे ही उद्योगाची महत्वपूर्ण भूमिका आहे. सोपी उत्पादने, सहज डिजिटल प्रक्रिया, आणि छोट्या मुलांसह असलेल्या कुटुंबांसाठी तंतोतंत तयार केलेले उपाय यामुळे संरक्षण-अंतर भरून काढता येऊ शकते. भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने पुढे जात असताना सर्वसमावेशक संरक्षण तितकेच आवश्यक आहे.
म्हणूनच बालदिन ही केवळ उत्सव साजरा करण्याची नव्हे, तर मुलांचे संरक्षण करण्याचीही आठवण आहे. प्रेम आणि प्रोत्साहन त्यांच्या स्वप्नांना दिशा देतात. पण योग्य तयारी त्यांना अनिश्चिततेपासून दूर ठेवते. आपल्या मुलांसाठी सुरक्षित उद्या निर्माण करण्यासाठी महत्वाचे आहेत. आज घेतलेले सुजाण निर्णय, प्रत्येक विमा योजना आणि प्रत्येक पॉलिसी जी त्यांच्या भविष्याची पायाभरणी अधिक मजबूत करते.
आणखी वाचा