भारतीय क्रिकेट संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमध्ये मजबूत स्थिती बघायला मिळतंय. मात्र, भारतीय संघ चिंतेत आहे. शुबमन गिलला शनिवारी 15 नोव्हेंबरला पहिल्या डावात बॅटिंग करताना मानेला त्रास जाणवला. हेच नाही तर तो गंभीर जखमी असल्याचे रिपोर्टमध्ये पुढे येताना दिसतंय. शुबमन गिलला मैदानात झालेल्या त्रासानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर चांगलेच संतापल्याची बातमी कळतंय. कर्णधार शुभमन गिलच्या मानेच्या उपचार करण्यासाठी तज्ज्ञांची व्यवस्था करण्यात झालेल्या विलंबामुळे भारतीय संघ व्यवस्थापन बंगाल क्रिकेट असोसिएशनवर नाराज झाले. वृत्तानुसार, शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी सायमन हार्मरच्या चेंडूवर चौकार मारताना त्याच्या मानेला दुखापत झाल्याने गिल मैदानाबाहेर गेला.
गिल फक्त तीन चेंडू खेळल्यानंतर चार धावा काढून रिटायर हर्ट झाला. मान आणि पाठीच्यावरच्या भागात त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते की, त्याला किती जास्त त्रास्त होतोय. त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभमनला उपचार मिळण्यास उशीर झाला. मुळात म्हणजे शनिवारी सकाळी ईडन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सराव करताना त्याची मान दुखत होती. भारतीय संघ व्यवस्थापनाने या विषयावर तज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.
🚨 Update 🚨
Captain Shubman Gill had a neck injury on Day 2 of the ongoing Test against South Africa in Kolkata. He was taken to the hospital for examination after the end of day’s play.
He is currently under observation in the hospital. He will take no further part in the… pic.twitter.com/o7ozaIECLq
— BCCI (@BCCI)
संघाचे फिजिओ आणि प्रशिक्षक यांच्या सल्ल्यानुसार शुभमन गिलच्या दुखापतीसाठी एका तज्ञाची व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय संघाने सामना आयोजकांना तज्ञ डॉक्टर आणण्याची विनंतीही केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि भर मैदानात त्याला पुन्हा त्रास झाला आणि त्याला सामना मुकण्याची वेळ आली. प्रचंड वेदना शुभमन गिलला मैदानात होताना दिसल्या.
🚨 Update 🚨
Shubman Gill has a neck spasm and is being monitored by the BCCI medical team. A decision on his participation today will be taken as per his progress.
Updates ▶️ https://t.co/okTBo3qxVH #TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ivd9LVsvZj
— BCCI (@BCCI)
नुकताच मिळालेल्या एका रिपोर्टनुसार, ज्यावेळी शुभमन याला मैदानात त्रास होत होता आणि प्रचंड वेदना होत होत्या, त्यावेळी मैदानावर कोणताही विशेषज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हता, फक्त एक आरएमओ उपलब्ध होता. खेळ सुरू झाल्यानंतर उशीरा तज्ञ डॉक्टर पोहोचले. यामुळे शुभमन गिलला उपचार मिळू शकला नाही आणि भर मैदानात त्याला त्रास झाला. संघ व्यवस्थापनाने झालेल्या प्रकारानंतर संताप व्यक्त केला. टीम इंडियासाठी वाईट बातमी असून शुभमन गिल दुखापतीमुळे कसोटीतून बाहेर राहणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली.