Urgent Need to Focus on Adolescents Health: "दहा ते १४ वयोगटातील किशोरवयीन मुलांकडे लक्ष दिल्यास त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. पुढे त्यांना प्रौढ वयात निरोगी आयुष्य जगता येईल, त्याचाच त्यांना पुढच्या पिढीसाठी फायदा होतो. अशा तीन पातळ्यांवर त्यांना लाभ मिळतो, याला आपण 'त्रिवार लाभ' असे म्हणू शकतो. म्हणून किशोरवयीन मुलांना प्राधान्य देणे, ही काळाची गरज असून, विकासाच्या चर्चेत त्यांना केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे," असे मत संयुक्त राष्ट्र बाल निधी संस्थेच्या (युनिसेफ) पोषणतज्ज्ञ राजलक्ष्मी नायर यांनी व्यक्त केले.
रस्ते सुरक्षा, पोषण आणि गर्भाशय मुखाचा कर्करोगया किशोरवयीन आरोग्याच्या बदलत्या परिस्थितीविषयी जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने बालहक्क, बालसुरक्षा, पोषण, शिक्षण, आरोग्य यासाठी काम करणारी जागतिक संस्था 'युनिसेफ'तर्फे पत्रकारांसाठी सोमवारी (ता. १७) एकदिवसीय राज्यस्तरीय क्षमतावृद्धी कार्यशाळा पुण्यात आयोजित केली होती. या कार्यशाळेत किशोरवयीनांच्या आरोग्यावरील सत्रात नायर बोलत होत्या. या वेळी पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
Heart Attack in Kids: लहान मुलांना खरंच हार्ट अटॅक येतो का? तज्ज्ञ सांगतात...या वेळी 'युनिसेफ'च्या दिल्लीतील आरोग्यतज्ज्ञ डॉ. सय्यद हुब्बे अली म्हणाले, "भारतात दरवर्षी रस्ते अपघातांत दीड लाखांहून अधिक मृत्यू होतात. एकूण मृत्यूपैकी ११ टक्के मृत्यू हे बालक, किशोरवयीनांचे आहेत." 'युनिसेफ' महाराष्ट्राचे प्रमुख संजय सिंग म्हणाले, "नागरिकांना त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत स्पष्ट, विश्वासार्ह माहिती मिळणे आवश्यक आहे."
Children Changing Lifestyle: रिकामी मैदानं, फुल प्ले झोन्स; मुलांमधील चिडचिडेपणा वाढून रोगप्रतिकारशक्ती झाली कमी'युनिसेफ'चे आरोग्यतज्ज्ञ मंगेश गढरी यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि 'युनिसेफ'च्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके, महाराष्ट्राच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सहाय्यक आयुक्त संध्या नगरकर यांनी 'किशोरवयीन पोषण आणि संतुलित आहारः संधी आणि अंमलबजावणी' या विषयावर आपले विचार मांडले.