भंडाऱ्यातील कॅनरा बँकेत मध्यरात्री दरोडा
सुरक्षा यंत्रणेला चकवा देत चोरट्यांनी बँकेत प्रवेश मिळवला
चोरीची नेमकी रक्कम अद्याप अस्पष्ट
परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे
भंडाऱ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनरा बँकेच्या शाखेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा घातला आहे. बँकेच्या सुरक्षा यंत्रणांना धाब्यावर बसवत या दरोडेखोरांनी कॅमेरे फोडत बँकेतील मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून नामांकित बँकेत दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला येथील कॅनरा बँकेच्या शाखेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बँकेच्या सुरक्षा यंत्रणेला भेदत आतील कॅमेरे फोडून मोठी रोकड आणि ऐवज लंपास केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
Badlapur Election : बदलापूर निवडणुकीत ‘नात्यागोत्यांचं’ कुटुंबराज! तब्बल १२ दाम्पत्य रिंगणात, एकाच घरातील ६जण उमेदवारबँकेत प्रवेश मिळवल्यानंतर चोरट्यांनी सर्वात आधी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले, जेणेकरून त्यांची ओळख पटू नये.बँकेतून नेमका किती मुद्देमाल, रोकड किंवा दागिने चोरीला गेले, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. बँक व्यवस्थापन आणि पोलीस यांच्या संयुक्त तपासानंतरच चोरीच्या नेमक्या मूल्याचा आकडा समोर येईल.
Pune Police : पुण्यात ६ पोलिसांविरोधात गुन्हा, पोलिस दलात मोठी खळबळ; नेमकं कारण काय?घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरोडेखोरांचा माग घेण्यासाठी आणि घटनेच्या पुढील तपासासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.तालुक्यात घडलेल्या या मोठ्या घटनेमुळे चिखला आणि आसपासच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी झालेल्या ज्वेलरी चोरांचा अद्याप शोध लागला नसून आता बँकेत झालेल्या दरोड्याने गोबरवाही पोलिसांचा कार्यप्रणाली पर नागरिकांचा रोष दिसत आहे.