वडीगोद्री (जि. जालना) : ‘‘मला मारण्याचा कट शिजला होता. याप्रकरणी सरकारी यंत्रणेने आमदार धनंजय मुंडे यांची चौकशी करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांना क्लीन चिट देऊ नये’’, असे मनोज जरांगे सोमवारी (ता. १७) अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे म्हणाले.
‘‘आमचा सरकार, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. ते मुंडे यांना पाठीशी घालत आहेत.
मला चौकशीपासून वाचवा, असे मुंडे म्हणतात, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची खात्रीशीर माहिती मला मिळाली आहे. सरकारने मुंडे यांना बळ देऊ नये.
याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील. मला जे संरक्षण दिले आहे ते काढून घेण्यासाठी अर्ज करणार आहे. घातपाताचा कट रचल्याप्रकरणी दोन संशयितांना जालना पोलिसांनी पकडले आहे.
Manoj Jarange : माझ्याविरोधात षड्यंत्राचे धनंजय मुंडे सूत्रधार; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप, मारण्यासाठी अडीच कोटींचा व्यवहारकट कसा शिजला, कोण सूत्रधार हे ते सांगत आहेत. तरीही शासन म्हणावी तशी चौकशी करताना दिसत नाही. नाव सांगितले तरी मुंडे यांना चौकशीला बोलावले जात नाही’’, असा आरोप त्यांनी केला.