जयसिंगपूर: थंडीच्या कडाक्यात पालिकेच्या निवडणुकीचे वातावरण गरम होताना दिसत आहे. शहरात ‘भूमिगत’ असलेल्या नेत्यांचे दर्शन होत आहे. आजवर शहराच्या विकासकामाचा गंध नसलेले हे भूमिगत नेते पाहून मतदारांचीही करमणूक होत आहे. स्वतःच्या नावासमोर अनेक सामाजिक पदव्या घेऊन सोशल मीडियावर चमकणाऱ्या या नेत्यांना पाहून मतदारांनाही हसू येत आहे.
जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. आरक्षणे जाहीर झाल्यापासून शहरात अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. जनमाणसात कानोसा घेण्यासाठी सुरुवातीला सोशल मीडियावर इच्छुकांनी चांगलाच प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.
Kolhapur Politics: ‘भ्रष्टाचार दाखवा, मीच बाहेर काढतो!’ पालकमंत्री आबिटकरांचा सतेज पाटीलांना थेट, रोखठोक संदेशयातून मिळत असलेला कल लक्षात घेऊन काहींनी निवडणुकीच्या मैदानातून ‘रिव्हर्स गिअर’ घेतला तर अनेकांनी निवडणूक लढवायचीच या निर्धाराने उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात आजवर न दिसलेले नेते सोशल मीडियावर चमकू लागले आहेत.
शहराच्या विकासाचा ध्यास, हक्काचा माणूस, चोवीस तास उपलब्ध नेता, विकासाच्या दृष्टीचं खणखणीत नाणं अशा अनेक पदव्या नावासमोर लावून आकर्षक छायाचित्रांसह अनेक संदेश सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळत आहेत, तर प्रचाराच्या निमित्तानेही ही मंडळी गल्लीबोळात दिसू लागली आहेत.
Kolhapur Politics: स्थानिकच्या निवडणुकीत राजकारण तापणार | Sakal Newsपण, मतदारांना या गोष्टीचे नवल वाटत आहे की आजवर शहराच्या कोणत्याही विकासाच्या मुद्द्यावर ही मंडळी दिसली नाहीत. शहरात अनेक कामे प्रलंबित असताना कोणत्याही कामासाठी साधे आंदोलन केले नाही की साधे निवेदनही दिले नाही. तरही ही मंडळी स्वतःला इतक्या पदव्या लावू कसे शकतात याचेच मतदारांना हसू आवरत नसल्याचे चित्र आहे.
असाही ‘ओव्हर कॉन्फिडन्स’उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. माघारीनंतत लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अनेक प्रभागांमध्ये काटा लढत होणार आहेत. तरीही ‘गुलाल आमचाच’ अशाही पोस्ट सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत.
मतांच्या गठ्ठ्यावर लक्षशहरात मतांचा गठ्ठा पाहून भूमिगत नेत्यांनी आपली ताकद आजमावायला सुरुवात केली आहे. मतदारांच्या थेट गाठीभेटी बरोबरच गठ्ठा मतदानाच्या ठिकाणी त्यांचा वावर दिसत आहे.