Ashes Series: इंग्लंड ऑस्ट्रेलिया ब्लॉकबस्टर सीरिज केव्हापासून? कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या सर्वकाही
GH News November 18, 2025 11:16 PM

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका अर्थात एशेज सीरिज 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला जाणार आहे. ही मालिका म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. त्यामुळे या कसोटी मालिकेची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहीली जात होती. आता ही मालिका सुरू होणार आहे. खरं तर इंग्लंडचा संघ मागच्या 14 वर्षात ऑस्ट्रेलिया एशेज मालिका जिंकलेला नाही. पण यंदा ऑस्ट्रेलिया संघात तेवढा जोर दिसत नाही. कर्णधार पॅट कमिन्ही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात खेळणार नाही. स्टीव्ह स्मिथ कर्णधारपद भूषवेल. जोश हेझलवूड आणि शॉन एबॉटही दुखापतग्रस्त असल्याने संघाबाहेर आहेत. त्यामुळे यंदा काय होणार याची उत्सुकता आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ 14 वर्षांचा दुष्काळ दूर करणार का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.

कुठे पाहता येईल एशेज सीरिज?

ऑस्ट्रेलिया इंग्लंड एशेज मालिका स्टार स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्स एचडी 1 वर पाहता येईल. यासह चाहत्यांना जिओ हॉटस्टारवर या मालिकेचा आनंद लुटता येईल.

किती वाजता ही मालिका सुरु होईल?

ऑस्ट्रेलिया इंग्लंड कसोटी मालिका भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता सुरु होईल.

एशेज मालिकेचं वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना- 21 नोव्हेंबर, पर्थ स्टेडियम, सकाळी 8 वाजता
  • दुसरा कसोटी सामना- 4 डिसेंबर, द गाबा स्टेडियम, सकाळी 9.30 वाजता
  • तिसरा कसोटी सामना- 17 डिसेंबर, एडिलेड ओव्हल, सकाळी 5.30 वाजता
  • चौथा कसोटी सामना- 26 डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, सकाळी 5.30 वाजता
  • पाचवा कसोटी सामना- 4 जानेवारी, सिडनी क्रिकेट ग्राउंड, सकाळी 5.30 वाजता

एशेज मालिकेसाठी दोन्ही संघ

ऑस्ट्रेलिया (पहिल्या सामन्यासाठी): स्टीव स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, ब्रेंडन डोगेट, कॅमरून ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, माइकल नेसर, मिचेल स्टार्क, जेक वेदरल्ड, बीयू वेबस्टर.

इंग्लंड: बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), जोफ्रा आर्चर, गस एटकिंसन, शोएब बशीर, जॅकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जोस टांग, मार्क वुड.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.