राज्य निसर्गचित्र स्पर्धेत अमर राऊळ प्रथम
माखजन येथे आयोजन; राज्यभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १८ : माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अशोक पोंक्षे कलादालनाच्या माध्यमातून दशक्रोशीतील प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी दशक्रोशस्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दशक्रोशीतून चित्रकला स्पर्धेला २९० विद्यार्थी तर राज्यस्तरीय निसर्गचित्र स्पर्धेला छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बारामती, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणांहून ९४ स्पर्धक आले होते. या स्पर्धेत देवरूखच्या डी-कॅडचा विद्यार्थी अमर राऊळने प्रथम क्रमांक पटकावला.
किशोर साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्याला ज्येष्ठ रंगकर्मी अशोक पोंक्षे, हनुमान पोंक्षे, अविनाश पोंक्षे, संस्था सचिव दीपक पोंक्षे, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, मुख्याध्यापक महादेव परब, मुख्याध्यापिका धनश्री भोसले, मनोज शिंदे, दीपक शिगवण, संजय सहस्रबुद्धे, सुभाष सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत राऊळ याला १२ हजार रु. व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्तिक कुंभार (बारामती) याने द्वितीय क्रमांक पटकावला असून, त्याला १० हजार रु. व सन्मानचिन्ह देण्यात आले. संदीप कुंभार (इचलकरंजी) याने तिसरा क्रमांक पटकावला असून, त्याला आठ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विरारच्या ओंकार धवन याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. त्याला सहा हजार व सन्मानचिन्ह देण्यात आले. अथर्व पाटील आणि आदित्य गुरव यांना विशेष सहभाग म्हणून गौरवण्यात आले. या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
चौकट
दशक्रोशी स्पर्धेचा निकाल
दशक्रोशी चित्रकला स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा ः गट क्र. १ (३री ते ४थी)- वक्रतुंड गुरव, वेदश्री भायजे, पूर्वा बाटे; उत्तेजनार्थ- श्रद्धा मेस्त्री. गट क्र. २ (५वी ते ७वी) प्राची निकम, वेदांत बोटके, वेदश्री जड्यार. उत्तेजनार्थ- आराध्या चव्हाण. गट क्र. ३ (८वी ते १०वी)- अर्पिता बागवे, साहिश मेस्त्री, सिमरन चांदिवडे; उत्तेजनार्थ- क्षितिज कदम.