आली लग्नघटिका समीप! साधी पण सुरेख, सूरज चव्हाणच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, नवरा-नवरीवर कधी पडणार अक्षता?
esakal November 18, 2025 09:45 PM

'बिग बॉस मराठी सीझन ५' चा विजेता ठरलेला लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एकीकडे सुरजचं घर बनून तयार आहे. तर दुसरीकडे त्याच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून देणार असल्याचं सांगितलं होतं. आता त्याचं घर बांधून झालाय आणि त्याने नुकताच त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केलाय. त्याचा एक व्हिडिओदेखील त्याने शेअर केलाय. आता सुरजच्या लग्नाची पत्रिका देखील व्हायरल झालीये.

सुरजने लग्न करत असल्याचं सांगितल्यानंतर चाहत्यांना त्याची होणारी पत्नी कोण आहे हे पाहण्याची उत्सुकता लागली होती. त्यानंतर कोकणहार्टेड गर्लने अंकिता प्रभू-वालावलकरने तिच्या घरी सुरज चव्हाण आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं केळवण केलं होतं. त्यावेळेस चाहत्यांना संजनाला पाहता आलं. त्यानंतर सुरजचं लग्न कधी आहे , कुठे आहे अशा चर्चा सुरू झाल्या. साखरपुडा, हळदी समारंभ, लग्नसोहळा सर्व गोष्टी एकाच दिवशी होणार सुरजने सांगितलं होतं. सुरज-संजनाच्या लग्नाच्या तारखेची माहिती अधिकृतरित्या समोर आलेली नाही. मात्र एका पेजवर त्याच्या लग्नाची पत्रिका शेअर करण्यात आली आहे. shatriya_ramoshi नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर सुरजच्या लग्नपत्रिकेचा फोटो पोस्ट करण्यात आलाय.

View this post on Instagram

A post shared by क्षत्रिय _रामोशी नाईक.| (@shatriya_ramoshi)

सुरज आणि संजनाचा शुभविवाह सोहळा कधी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेवरील माहितीनुसार, साखरपुडा समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता, हळदी समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता आणि लग्नसमारंभ त्याच दिवशी संध्याकाळी 6.11 वाजता या शुभ मुहूर्तावर होणार आहे. पुण्यातील माऊली गार्डन हॉल येथे संजना आणि सुरजचं लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे. आता प्रेक्षक या लग्नासाठी उत्सुक आहेत.

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.