New Historical Marathi Show : स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांना पहायला मिळाल्या. राजा शिवछत्रपती, जय भवानी जय शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून महाराष्ट्राचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान अशातच आता क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची संघर्षमयी जीवनाची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
साधरण: दिडशे वर्षापूर्वी महिलांना चूल आणि मूल या बंधनात राहावं लागत होतं. परंतु या समाज व्यवस्थेविरोधात सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांनी एल्गार पुकारला. या दोघांनी मिळून मुलींच्या शिक्षणाचा ठसा उमटवला. मुलींना शिकवून त्यांना सज्ञान करण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केली.
दरम्यान हीच गोष्ट आजच्या पिढीला कळावी यासाठी स्टार प्रवाह वाहिनी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊन येत आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले ही सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारणार आहे. तर या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे हे ज्योतीबा फुलेंच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेबद्दल बोलताना मधुराणी गोखले म्हणाल्या, 'सावित्रीबाई फुले यांचं आभाळाइतकं व्यक्तिमत्त्व साकारायची संधी मिळतेय. आज आपण मोकळेपणाने शिक्षण घेतोय. महाराष्ट्रातील मुली जगात आपला ठसा उमटवत आहेत. त्यासाठी दीडशे वर्षापूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला त्या सगळ्यांच्या वतीनं सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय, याचा मला खूप अभिमान वाटतोय. प्रेक्षकांची साथ कायम राहावी हीच अपेक्षा आहे.'
दरम्यान 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' ही मालिका 5 जानेवारी 2026 पाहून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्यासंघर्षमय जीवनाचा आढावा घेतला जाणार आहे. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्स निर्मिती संस्थेनं ही मालिका निर्मित केलीय.
उषा नाडकर्णीं यांनी सांगितला स्वामींच्या प्रचितीचा अनुभव, म्हणाल्या...'हिंदुजा हॉस्पिटलच्या वाटेवर...'