Kidney Damage Foods : 'हे' खाल्लं तर किडनी लवकर होते खराब! आजच डाइटमधून काढून टाका
esakal November 19, 2025 06:45 AM

Kidney Damage Foods

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?

अयोग्य आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे किडनीच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत.

Kidney Damage Foods

किडनीला गुपचूप नुकसान करणारे ४ फूड्स!

किडनीचे मुख्य काम म्हणजे, रक्त शुद्ध करणे आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकणे. त्यामुळे किडनी निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Kidney Damage Foods

'हे' खाल्लं तर किडनी होते खराब

चला तर जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत, जे तुमच्या किडनीला नुकसान पोहोचवत आहेत.

Kidney Damage Foods

१) पॅकेज्ड फूड्स

पॅकेज्ड फूड्स, जास्त मीठ असलेले स्नॅक्स, डबाबंद चिप्स, अचार यांसारख्या पदार्थांमुळे ब्लड प्रेशर वाढू शकते. ब्लड प्रेशर वाढल्याने किडनीवर अतिरिक्त ताण पडतो आणि तिचे कामकाज प्रभावित होऊ शकते.

Kidney Damage Foods

२) प्रोटीन शेक किंवा रेड मीट

रेड मीट किंवा प्रोटीन शेकचे जास्त सेवन केल्यास किडनीवर अति भार पडतो. ज्यांना आधीपासूनच किडनीची समस्या आहे, त्यांनी या पदार्थांपासून विशेषतः दूर राहणे गरजेचे आहे.

Kidney Damage Foods

३) जास्त प्रमाणात मद्यपान

अधिक मद्यपान केल्याने शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) निर्माण होते. यामुळे किडनीला जास्त मेहनत करावी लागते आणि कालांतराने किडनी कार्यक्षमता कमी होऊ शकते.

Kidney Damage Foods

४) सॉफ्ट ड्रिंक्स

जास्त साखर असलेल्या पेयांमध्ये सॉफ्ट ड्रिंक्सचा समावेश होतो. ही पेये शुगर वाढवतात, वजन वाढवतात आणि हे दोन्ही घटक किडनीच्या आजारांचे प्रमुख कारण ठरू शकतात.

Kidney Damage Foods

किडनी कशी ठेवणार निरोगी?

किडनीला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करा -

ब्लूबेरी, लाल ढोबळी मिरची आणि फॅटी फिश यांसारखे पदार्थ किडनीसाठी फायदेशीर मानले जातात.

Kidney Damage Foods

डिस्क्लेमर :

प्रिय वाचकांनो, ही माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. हा लेख उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. कोणत्याही आरोग्यसंबंधी उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Peas Side Effects

येथे क्लिक करा... Peas Side Effects : हिवाळ्यात 'ही' एक भाजी ठरू शकते धोकादायक! कोणी टाळावी ते जाणून घ्या...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.