05085
पणदूर येथे बाळासाहेबांना अभिवादन
कुडाळ, ता. १८ ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पणदूर शिवसेना शाखेत प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव दादा साईल, गोपाळ पालव, अमेय पालव, विनायक अणावकर, किशोर पारकर, गजानन कुलकर्णी, शंकर परब, शाखाप्रमुख विवेक निर्गुण, शाखा उपप्रमुख सुंदर पणदूरकर, युवासेना उपशाखा प्रमुख सचिन साईल, राजा पणदूरकर, प्रकाश गोसावी, अनिकेत राऊळ, प्रथमेश साईल, महेंद्र साईल, तन्मय साईल, नयना साईल, मनीषा साईल, विनायक साईल, पवन पणदूरकर, तात्या पणदूरकर, संजोग साईल, कुणाल हुमरमळेकर उपस्थित होते.
..................
05086
वक्तृत्व स्पर्धेत सानिका, अद्विताचे यश
सावंतवाडी, ता. १८ ः सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय मंडळ आयोजित सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी सुयश प्राप्त केले. यामध्ये पाचवी ते सातवी या गटातून सातवीतील सानिका नाईक हिने प्रथम, तर आठवी ते दहावी गटातून नववीतील अद्विता दळवी हिने तृतीय क्रमांक मिळविला. ग्रंथालयातर्फे विजेत्या स्पर्धकांचा रोख रक्कम, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थापक अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले.