गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. अनमोल बिश्नोई याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची आरोप आहेत. त्याच्यावर राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात हात असल्याचा आरोप आहे. याच सोबत अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्याचाही आरोप आहे.अनमोल बिश्नोई याला भारत आणणे हे तपास यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे. त्याला अमेरिकेतून भारतात डिपोर्ट केले जात आहे. या अटकेने देशात झालेल्या अनेक हायप्रोफाई गुन्ह्यांचा तपासाला नवी दिशा मिळणार आहे.
अनमोल बिश्नोईवर मुंबईतील एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचाही आरोप आहे. तपास यंत्रणा अनमोल बिश्नोई याला भारतात आणून या प्रकरणातील अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. अनमोल बिश्नोई याला भारतात आणण्याचा प्रयत्न हे तपास यंत्रणाचे मोठे यश मानले जात आहे. त्याला भारतात आणताच अटक केली जाणार आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतर अनमोल फरार झाला होता. त्यानंतर त्याचे लोकेशन अमेरिकेत सापडले होते. तो अमेरिकेत बसून भारतात खंडणीसह अनेक रॅकेट चालवत होता. भारतात अनेक राज्यात अनमोल बिश्नोई याच्या विरोधात केस सुरु आहेत.
सलमान खानच्या घरी हल्ल्याचा प्रयत्नअनमोल बिश्नोई याच्यावर अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ल्याच्या कटात सामील होण्याचा आरोप आहे. हे प्रकरण खूप गाजले होते. भारतात तो पोहचल्यानंतर या संबंधित पुरावे गोळा करण्यास तपास यंत्रणांना यश मिळणार आहे. सुरक्षा आणि कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर अनमोल बिश्नोईला लवकरच भारतीय तपास यंत्रणाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. संघटीत गुन्हेगारी आणि त्यासंबंधीत आंतरराष्ट्रीय नेटवर्क विरोधात सुरु असलेल्या कारवाईत हा घटनाक्रम एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे. भारतात त्याला आणल्यानंतर पोलिस त्याची चौकशी करणार आहेत.
झिशान सिद्दीकी काय म्हणाले ?अनमोल बिश्नोई याच्या संदर्भात झिशान सिद्दीकी यांनी सांगितले की, ‘आम्ही सर्वांना संपर्क केला होता. एक पीडीत कुटुंबाच्या रुपात आम्ही अपिल केली होती. आज उत्तर आले आहे. आम्हाला माहीती मिळाली की तो युएसएमध्ये डिटेन झाला आहे. आता माहिती पडले की युएसएसमधून बाहेर काढले आहे.आता योग्य माहीती मिळू शकलेली नाही. सरकारला विनंती आहे ती यावर एक्शन घ्यावी आणि अनमोल बिश्नोई याला मुंबईत आणावे. तो संपूर्ण समाजासाठी धोका आहे.’