दुसऱ्या तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा साधनांना मागणी
मुंबई, ता. १८ : देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्येही अत्याधुनिक सुरक्षा साधनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स विभागाचा व्यवसायाची वाढ होत आहे.
विशेषतः सणासुदीच्या काळातही ग्राहकांनी अत्याधुनिक सुरक्षा साधनांसाठी डिजिटल आणि प्रत्यक्ष दुकानातूनही मोठी मागणी नोंदवली. दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीची शहरे या साहित्याच्या विक्री महसुलातील ३० टक्के महसूल मिळवून देत आहेत, असे कंपनीचे बिझनेस हेड पुष्कर गोखले म्हणाले. शहरीकरणाची वाढ, घरगुती वित्तीय मालमत्तेत साडे चौदा टक्के वाढ, या कारणांमुळे आता सुरक्षा साधनांची उदाहरणार्थ अत्याधुनिक तिजोऱ्या, सेफ, व्हॉल्ट आदीची मागणी वाढत आहे. अनेक घरांमध्ये इंटिरियरशी मिळते जुळते लॉकर मागितले जातात. संस्थांमध्ये मॉड्युलर स्ट्रॉंग रूम सोल्युशन वापरली जातात. ही साधने देखील गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सतर्फे पुरवली जातात. इंदूर, गुवाहाटी, कोची या दुसऱ्या श्रेणीच्या शहरांवर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचेही गोखले म्हणाले.