शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे
मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : तालुक्यातील खरवते-दहिवली येथे आयोजित कृषी महाविद्यालयाच्या स्पोर्टेक्स २०२५ क्रीडा स्पर्धेत कबड्डीत मुलांमध्ये शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय तर मुलींमध्ये दापोली कृषी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले.
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या कबड्डी व व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. स्पर्धेसाठी सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, डॉ. अरुण माने, संदीप थोरात, प्रा. उमेश लकेश्री उपस्थित होते. स्पोर्टेक्स ः २०२५ मध्ये कोकणातील सुमारे २० कृषी महाविद्यालये व ६०० खेळाडू सहभागी झाले होते. सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाने तिसरा क्रमांक पटकावला. कबड्डी मुलींमध्ये दापोली कृषी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले असून, दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाला तिसरा क्रमांक मिळाला. व्हॉलीबॉल (मुली) क्रीडाप्रकारात दापोली कृषी महाविद्यालयाला विजेतेपद मिळाले असून, मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले आहे. दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाला तिसरा क्रमांक मिळाला. व्हॉलीबॉल मुलांमध्ये दापोली कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय विजेते ठरले असून, दापोली कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय उपविजयी ठरले. त्यामध्ये शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाने तिसरा क्रमांक पटकावला.