मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला सचिन तेंडुलकर श्री सत्य साईबाबांच्या भक्तगणांपैकी एक आहे. सचिन तेंडुलकर अनेकदा सत्य साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी गेला आहे. आताही सचिन तेंडुलकर त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. नुकताच श्री सत्य साईबाबा यांच्या शताब्दी समारंभात त्याने हजेरी लावली. यावेळी सचिनने त्यांच्यासोबत एक अनुभव शेअर केला आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे पार पडलेल्या शताब्धी समारंभात उपस्थित असलेल्या भारतरत्न सचिन तेंडुलकर याने 2011 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान सत्य साईबाबांशी निगडीत एक अनुभव सांगितला. स्पर्धेदरम्यान कसा आत्मविश्वास दिला याबाबत सांगितलं. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने, श्री सत्य साईबाबा यांचा त्याच्या जीवनावर कसा प्रभाव होता याबाबतही सांगितलं.
सचिन तेंडुलकरने सांगितलं की, हा शेवटचा वनडे वर्ल्डकप आहे हे माहिती होतं. क्रिकेटमधील सर्वात मोठी ट्रॉफी जिंकण्याची शेवटची संधी होती. संघासोबत बंगळुरुमधील एका कॅम्पमध्ये आला होता आणि नेमका तेव्हाच एक फोन आला. त्यात सांगितलं की, बाबांनी एक पुस्तक पाठवले आहे. ते ऐकून आनंदाला पारावर उरला नाही. त्यामुळे मनात भावना आल्या की हा वनडे वर्ल्डकप त्याच्यासाठी खास असणार आहे. बाबांच्या पुस्तकाने त्याला आत्मिक शक्ती दिली आणि आत्मविश्वास वाढला. सचिन तेंडुलकरने सांगितलं की, हे पुस्तक संपूर्ण स्पर्धेत त्याच्यासोबत खऱ्या साथीदारासारखे राहिले.

सचिन तेंडुलकर म्हणाला की, ‘2011 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत काय घडलं हे सर्वांना माहिती आहे. जेव्हा भारताने मुंबईत श्रीलंकेला पराभूत करून जेतेपद जिंकलं. तेव्हा संपूर्ण देशात आनंदाने जल्लोष झाला. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील हा सुवर्ण क्षण होता. मला वाटत नाही की मी माझ्या कारकिर्दीत यापेक्षा चांगला अनुभव घेतला असेल. संपूर्ण देश आनंदात पाहण्याची संधी मिळाली.’ सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला की, हे सर्व काही शक्य झालं कारण श्री सत्य साई बाबा यांचे आशीर्वाद पाठीशी होते.