वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक आयसीसीने केलं जाहीर, भारत पाकिस्तान सामना होणार की नाही? जाणून घ्या
GH News November 19, 2025 07:12 PM

आयसीसी अंडर 19 मेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धा 2026 मध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. ही स्पर्धा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. असं असताना आयसीसीने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार नाही. कारण आयसीसीने गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेलं हे द्वंद्व काही अंशी शमवल्याचं दिसत आहे. आयसीसीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही गटांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे साखली फेरीत या दोन्ही संघांची भिडत काही होणार नाही. फार फार तर बाद फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात. आयसीसीने 19 नोव्हेंबरला नामिबिया आणि झिम्बाब्वे येथ ङोणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

वनडे फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणारी ही स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर 6 फेब्रुवारीला अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ असून चार गटात विभागणी केली आहे. यात सर्वाधिक पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या भारतीय संघाला अ गटात ठेवलं आहे. या गटात भारतासोबत न्यूझीलंड, बांग्लादेश आणि अमेरिका आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. हा सामना झिम्बाब्वेच्या बुलावायोत होईल,

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितलं की, या स्पर्धेची उत्सुकता आहे. यात जागतिक क्रिकेटमधील भविष्यातील तारे दिसतील. “आयसीसी अंडर 19 मेन्स क्रिकेट विश्वचषक हा दीर्घकाळापासून महानतेचा जन्मस्थान राहिला आहे. ही स्पर्धा केवळ पुढच्या पिढीतील क्रिकेटपटूंनाच नव्हे तर पुढच्या पिढीतील आयकॉननाही समोर आणते. ब्रायन लारा आणि सनथ जयसूर्यापासून ते विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि शुबमन गिलपर्यंत, या स्पर्धेने आपल्या खेळाचे भविष्य सातत्याने घडवले आहे.”

गट अ मध्ये भारत, बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. गट ब मध्ये सह-यजमान झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंड आहेत. गट क मध्ये गतविजेता ऑस्ट्रेलिया , आयर्लंड, जपान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. गट ड मध्ये टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.