स्पाईस लाऊंड फूड्स वर्क कंपनीच्या (Spice Land Foods Work Company) शेअरमध्ये गुरुवारी तुफान आले. हा शेअर 65.53 रुपये प्रति शेअरवर पोहचला. या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी दिसून आली. हा शेअर सलग सातव्या दिवशी उच्चांकावर आहे.
स्पाईस लाऊंड फूड्स वर्क कंपनीच्या शेअरमध्ये एक आठवड्यापासून अप्पर सर्किट आहे. गुरुवारी हा पेनी शेअर NSE वर 65 रुपयांवर ट्रेड करत आहे तर बुधवारी त्याची किंमत 62.41 रुपये इतकी होती. हा शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदार लक्ष ठेऊन आहेत.
या शेअरमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा छोटुराम जवळपास 21 टक्क्यांनी वधारला. या शेअरने केवळ सहा महिन्यात 264.24 टक्के आणि या वर्षात आतापर्यंत 585.46 टक्क्यांचा जोरदार परतावा दिला. हा शेअर मल्टिबॅगर ठरला.
29 ऑक्टोबर रोजी कंपनीने Rightfest Hospitality LLP मध्ये 100 हिस्सेदारी खरेदी केली आहे. डायनिंग आणि फूड सेक्टरमध्ये कंपनीने मोठी झेप घेतली आहे. या घडामोडीनंतर हा शेअर सध्या उच्चांकावर आहे. गुंतवणूकदारांच्या नजरा या शेअरकडे वळल्या आहेत.
शालीमार एजेन्सीज लिमिटेड असे स्पाईस लाऊंड फूड्स वर्क कंपनीचे पूर्वीचे नाव होते. नवीन नाव ऑगस्ट 2025 मध्ये बदलले गेले. ही कंपनी फूड आणि आयटी क्षेत्रात काम करते. ही कंपनी इतरही अनेक ब्रँड्स द्वारे व्यापारी उलाढाल करते.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.