- rat२०p७.jpg-
२५O०५५७८
राजापूर ः नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना रघुवीर बापट, भीमराव कोंडविलकर, मेघनाथ गोसावी.
---
राजापूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव गोसावी
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षकसंघ; नवी कार्यकारिणी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षकसंघाची राजापूर तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून, तालुकाध्यक्षपदी पदवीधर शिक्षक चांगदेव गोसावी यांची तर सचिवपदी बलभीम पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाची राजापूर तालुक्याची कार्यकारिणीची नुकतीच सभा झाली. या सभेला संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रघुवीर बापट, भीमराव कोंडविलकर, जिल्हा कोषाध्यक्ष मेघनाथ गोसावी, जिल्हा प्रतिनिधी रसाळ, शिक्षक काळे, बोडके, बाचिपले यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. या सभेमध्ये राजापूर तालुक्याची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी चांगदेव गोसावी, उपाध्यक्षपदी धनाजी माळवे, सागर येवले, सचिवपदी बलभीम पाटील, कार्याध्यक्ष बाबूराव जावळे, कोषाध्यक्ष विलास धुमाळे, जिल्हा महिला प्रतिनिधी कविता आईर, तालुका महिला आघाडी प्रमुख आरती पाटील यांची निवड झाली आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यावर भर द्या, अशा अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केल्या आहेत.