प्राजक्ता माळीचा मराठी चित्रपट 'फुलवंती' जगभर खूप गाजला.
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
'फुलवंती'मध्ये प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) 'फुलवंती' (phullwanti ) चित्रपटामुळे कायम चर्चेत असते. नुकतीच 'फुलवंती'बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 'फुलवंती' चित्रपट 11 ऑक्टोबर 2024ला थिएटरमध्ये रिलीज झाला. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2024ला चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाला. 'फुलवंती' चित्रपटाचे जगभरात चाहते असल्यामुळे 'फुलवंती' हिंदीत यावा असे अनेकांना वाटत होते. तशी इच्छाही प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात आली होती.
View this post on Instagram
नुकताच प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी 'फुलवंती' चित्रपटाविषयी मोठी अपडेट चाहत्यांना दिली आहे. व्हिडीओत सांगितल्यानुसार 'फुलवंती ' हा चित्रपट आता हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे. 2024 ला थिएटर रिलीजनंतर 'फुलवंती' अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्म मराठीत पाहायला मिळाला. आता चित्रपट अॅमेझॉनप्राइमवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
डबिंग कोणी केलंय?'फुलवंती ' चित्रपटाचे हिंदीत डबिंगही प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी केले आहे. त्यांचाच आवाज तुम्हाला हिंदीतही ऐकू येणार आहे. चित्रपटातील गाणी देखील सुंदररित्या हिंदीत डब करण्यात आली आहेत. तसेच 'फुलवंती' च्या हिंदी गाण्याचा एक वेगळा अल्बम तयार करण्यात आला आहे. व्हिडीओला खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "फुलवंती अब हिंदी में...देर आए दुरुस्त आए!" या व्हिडीओ चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्स, शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
'फुलवंती' चित्रपटातून प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री स्नेहल तरडेने केले. 'फुलवंती' चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. 'फुलवंती' हा चित्रपट बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित आहे.'फुलवंती'ने छप्परफाड कमाई केली.
Madhuri Dixit : 'धकधक गर्ल' सोबत झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता, नवीन वेब सीरिजची घोषणा