आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगीतल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मानवाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरतात. त्याला जीवन जगण्याची प्रेरणा देतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात, अशा काही चुका असतात, ज्या कधीच माफ केल्या जाऊ शकत नाहीत, तुम्ही जर या चुका कराल तर तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची दुसरी संधी कधीच भेटत नाही, यामुळे तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. तुमचं आयुष्य बरबाद होऊ शकतं, त्यामुळे मानवाने कधीही या चुका करू नयेत. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
वेळेला हलक्यात घेणे – चाणक्य म्हणतात वेळ कोणासाठीही कधीही थांबून राहत नाही, तसेच एकदा वेळ निघून गेली की ती पुन्हा कधीही परत येत नाही, त्यामुळे माणसाने आपलं प्रत्येक काम हे वेळेतच करायला हवं. अभ्यास हा विद्यार्थी दशेतच व्हायला हवा, तुम्ही जर विद्यार्थी दशेत चांगला अभ्यास केला तर भविष्यात तुम्हाला चांगला रोजगार मिळू शकतो, तुम्ही तुमचं उर्वरीत आयुष्य आनंदात जगू शकता, मात्र ही जर वेळ निघून गेली तर मग मात्र तुमच्या हातात पश्चातापाशिवाय दुसरं काहीही राहणार नाही.
चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवणं – चाणक्य म्हणतात आयुष्यात कधीही चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवू नये, हे लोक कधी दगा देतील याचा भरोसा नसतो, त्यांच्यामुळे भविष्यात तुम्हाला फार मोठं नुकसान होऊ शकतं.
भावनिक होऊ एखादा निर्णय घेणं – चाणक्य म्हणतात कधीही भावनिक होऊन कोणताही निर्णय घेता कामा नये, कारण भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकण्याची शक्यताच जास्त असतं.
आपली चूक लपवणं – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमची चूक लपवू नका, उलट ती मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करा, पुढे जात रहा, त्यातच तुमचं हित आहे.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)