India-Pakistan Conflict: 22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे समोर आले. त्यानंतर भारताने 7 मे 2025 रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवला. 7-10 मे 2025 रोजी भारत-पाकमध्ये संघर्ष उडाला. या संघर्षात चीनने स्वतःचे उखळ पाढरं करून घेतलं. त्यांनी शस्त्रांचं परीक्षण केलं. तसेच गुप्त इनपूट पाकला पुरवले असा दावा अमेरिकन काँग्रेसच्या एका अहवालात समोर आला आहे. तर आता पाकिस्तानने भारताचे किती विमानं पाडली याचा आकडाही समोर आला आहे. या अहवालाने पाकच्या खोट्या प्रचाराला चपराक लगावली आहे.
इस्लामाबादचा दावा चीनची चुकीची माहिती
भारताचे राफेल पाडल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला होता. पण युएस-चायना इकोनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमीशनच्या नवीन अहवालात इस्लामाबादचा हा दावा चुकीचा आणि अनेक विसंगती अधोरेखित करत असल्याचे म्हटले आहे. चीनने चुकीची माहिती पुरवल्याचे आणि त्याआधारेच पाकने दावा केल्याचे या अहवालात म्हटले आहे. चीनने या युद्धात पाकचा वापर करून घेतला. चीनने त्यांची शस्त्रे पाकच्या माथी मारली. तर काही शस्त्रांचे आणि लष्करी गोपिनियतेचा प्रयोग करून पाहिल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. चीनने या युद्धातून त्याचा हेतू साध्य केल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे.
भारताची किती विमानं पाडली?
तर पाकिस्तानने भारताची सहा विमाने पाडल्याचा दावा केला होता. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षात 8 विमानं पाडल्याचे म्हटले होते. चीनच्या आधारे पाक भारताचे राफेल पाडल्याचा दावा करत होता. पण हे सर्व दावे फोल असल्याचे समोर आले. पण काँग्रेसच्या नवीन अहवालानुसार, भारताचे तीन विमानं पाडण्यात आली असावी. त्यात सर्व राफेल नव्हती. अर्थात हा केवळ अंदाज आहे. ही केवळ शक्यता आहे. तर ट्रम्प यांचा दावा ग्राह्य धरला तर पाकचे पाच विमानं पाडल्याचे समोर येत आहे.
पण भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, मे महिन्यातील संघर्षात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवाई दलाच्या आकडेवारीनुसर, पाकिस्तानचे 12-13 विमानं भारतीय लष्कराने पाडली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकची एफ-16 सह किमान एक डझन लष्करी विमानं नष्ट झाली. भारताने एअर स्ट्राईकविषयी जे पुरावे दिले, त्यानुसार, पाकचे C-130 विमान, AEW&C प्लॅटफॉर्मसह चार ते पाच फायटर जेट आणि F-16 चे सर्वाधिक नुकसान झाले. त्यामुळे पाकला मोठा फटका बसला. त्याहून नाचक्की चीनची झाली. चीनचे युद्ध साहित्य आणि गुप्त माहितीचा पाकिस्तानला मदत होण्याऐवजी फटका बसला. त्याची तक्रारही पाकला करण्याची सोय उरली नाही.