बारामती, ता. २० : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे खासगी दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच ४२- बीव्ही’ क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. ज्यांना खासगी चारचाकी वाहनांसाठी तिप्पट रक्कम भरून आकर्षक, तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल, त्यांनी मंगळवारी (ता. २५) दुपारी तीनपर्यंत धनादेशासह विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी मंगळवारी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डी. डी. जमा करावयाचा असेल, त्यांनी बुधवारी (ता. २६) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता संबंधित अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा धनादेश भरलेल्या व्यक्तीस नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाणार आहे.