चिपळुणात आजपासून
मोफत दंत तपासणी
चिपळूण : शहरातील अवनीश हॉस्पिटल येथे दंत चिकित्सा व ऑर्थोडोन्टीक केअर सेंटरच्या वतीने मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते ३० नोव्हेंबर यादरम्यान हे शिबिर चालणार आहे. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत दंत तपासणी होणार आहे. डॉ. शरयू जाधव यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी हे शिबिर आहे. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ हे रुग्णालय असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शरयू जाधव यांनी केले आहे.