हिवाळा सुरू होताच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. या दिवसांमध्ये जास्त करून व्हिटॅमिन डीची कमतरता अधिक भासू लागते. कारण थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नाही. तर व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत सुर्यप्रकाश आहे. त्याशिवाय लोकं थंडीपासून वाचण्यासाठी जास्त वेळ घरात असतात, म्हणून शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही. अशावेळेस हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता सामान्य होते.
हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करते. शरीर योग्य रित्या कार्य करण्यासाठी अनेक खनिजांसह पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन आणि प्रथिने आवश्यक असतात. कारण तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या कमतरता जाणवत असेल तर शरीरात वेदना, स्नायू कमकुवत होणे, थकवा आणि आळस येऊ शकतो. तसेच त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर खोलवर परिणाम होतो, ज्यामुळे शरीर संसर्गास अधिक संवेदनशील बनते आणि आपण सर्दी आणि फ्लू सारख्या आजारांना सहज बळी पडते. काही प्रकरणांमध्ये, मूड स्विंग, चिडचिड आणि झोपेचा त्रास देखील दिसून येतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये हाडांची वाढ मंदावते आणि वृद्धांमध्ये हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका वाढतो. यासाठी हिवाळ्यात व्हिटॅमिन डीचे संतुलित सेवन राखणे अत्यंत महत्वाचे आहे.
तज्ञांच्या मते हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सकाळी 10 वाजता ते दुपारी 1 वाजता या वेळेत 15 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाशात राहिल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी नैसर्गिकरित्या वाढते.
याव्यतिरिक्त आहारात अंड्यामधील पिवळा भाग, मशरूम, फोर्टिफाइड दूध, दही, तूप आणि फॅटयुक्त मासे यासारखे पदार्थ समाविष्ट करा.
नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे पोषक तत्वांचे शोषण देखील सुधारते. लक्षात ठेवा की कोणतेही पूरक आहार स्वतः घेऊ नका; प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. शिवाय, वयानुसार शरीराची व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमता कमी होते, म्हणून वृद्धांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांना उन्हात खेळण्यास प्रोत्साहित करणे त्यांच्या हाडांच्या विकासासाठी देखील फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी हे देखील आवश्यक आहे
दररोज किमान 15 मिनिटे उन्हात उभे राहा.
तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.
हिवाळ्यात जास्त घरात राहणे टाळा.
नियमित व्यायाम करा.
गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूरक आहार घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)