२३ नोव्हेंबरला ठाणे–कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार
काही लोकल गाड्या स्लो मार्गावर वळवल्या जातील
अंदाजे १० मिनिटे विलंब अपेक्षित
हार्बर व ट्रान्स-हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. रविवारी २३ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर मार्ग व ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचं रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेच्या परिपत्रकानुसार, रविवारी २३ नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर मार्ग व ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ०९.३४ ते १५.०३ वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद - अर्ध जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांबरोबरच कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवरही थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्य स्थानकावर पोहचतील.
Accident News : ५० मजूरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमीकल्याण येथून १०.२८ ते १५.४० वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप जलद -अर्ध जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर या सेवा पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
Accident News : ५० मजूरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल-एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावरून वळवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादरकडे येणाऱ्या अप मेल-एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे,विक्रोळी दरम्यान ६व्या मार्गावरून वळवल्या जातील.हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे. फक्त बेलापूर आणि पनवेल दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक राहील. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.