एकनाथ शिंदे आज वाड्यात
वाडा, ता. २१ (बातमीदार) ः उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा वाडा येथे होणार आहे. येथील गुडलक मैदानात शनिवारी (ता. २२) दुपारी साडेतीन वाजता सभा होणार आहे. या वेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, उपनेते प्रकाश पाटील, नीलेश सांबरे, आमदार शांताराम मोरे, जिल्हाप्रमुख देवानंद थळे, वसंत चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.