मद्याचे सेवन आरोग्यासाठी खूपच नुकसान करणारे म्हटले जाते. परंतू थंडीत शरीरास गरम करण्यासाठी काहीजण कॅफीन ( चहा -कॉफी ) याशिवाय अल्कोहोलचा आसरा घेतात. मर्यादित घेतल्यास शरीरास याचा फायदा असतो असा तर्क हे लोक मानत असतात. तुम्ही ऐकले असेल की थोडीशी रम किंवा ब्रँडी थंडीत घेतल्याने शरीराला उब मिळते आणि सर्दी तसेच खोकला होत नाही. लहान मुलांना थंडीत खोकला सर्दी झाली तर चमचा भर ब्रँडी पाजण्याचा सल्ला दिला जात असतो. या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी बोललो त्यावेळी त्यांनी काय मत मांडले पाहूयात…
थंडीत जेव्हा तापमान घसरते तेव्हा तुम्हाला बाहेरुन स्वत:ला उब निर्माण करावी लागते आणि स्वत: गरम ठेवू सारे वाटते. आणि आतुन उष्णता येण्यासाठी गरम गुणधर्म असलेल्या वस्तू घेण्याचा सल्ला दिला जात असतो. त्यामुळे अनेकांचे अनेक गैरसमज असतात. त्यामुळे या लेखात पाहूयात की एक चमचा रम प्यायल्याने थंडीत उष्णता मिळते का ? तज्ज्ञाचे म्हणणे काय ? थंडीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.
थंडीत रम पिणे योग्य आहे का ?फेलिक्स हॉस्पिटलचे सीएमडी डॉक्टर डी.के. गुप्ता यांच्या मते लोकांमध्ये गैरसमज आहे की दारु शरीराला गरम ठेवते. वास्तविक आपण रम किंवा कोणतेही मद्याचे सेवन करतो. तेव्हा रक्ताचा प्रवाह वेगाने वाहू लागतो. त्यामुळे काही वेळ शरीराला उष्णता वाटते. त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी लोक मद्याचा आसरा घेत असतात. परंतू वास्तवात याने शरीराचे कोर तापमान आणखी लवकर घसरते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.
होऊ शकते नुकसानलोकांना वाटते थंडीत थोडीशी रम प्यायल्याने थंडीपासून वाचता येते किंवा सर्दी खोकला येत नाही तर परंतू यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. डॉक्टर गुप्ता यांच्या मते तर एक घोट रम घेतल्याने हळूहळू तुमची इम्युनिटी कमी होऊ लागते. शरीर डिहायड्रेट ( पाणी कमी होणे ) होऊ लागते. त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते. आणि मूड स्विंग होतो.