चमकदार अन् सुंदर त्वचेसाठी करीना कपूर स्वयंपाकघरातील या वस्तूंपासून बनवते फेसपॅक; स्वत:च केला खुलासा
Tv9 Marathi November 22, 2025 12:45 AM

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान ही अशी एक आयकॉन आहे जिच्या सौंदर्याने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. करीना कायमच तिच्या अभिनयासोबतच तिचे सौंदर्य, तिच्या मोहक अदा आणि तिची एक खास बेबो स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्या स्टाइल आणि लूकच्या चाहते नेहमीच प्रेमात पडतात. सध्या करीना 44 वर्षांची आहे तरीही ती फीट आणि सुंदरच आहे. पण या वयातही तिला हे सर्व हाताळणे कसे काय शक्य होते हे जाणून घेण्याची चाहत्यांची नक्कीच इच्छा असते.

करीना कपूर वापरते हा घरगुती फेस मास्क 

तर करीना कपूर तिच्या इतर ब्युटी ट्रिक्ससोबतच घरगुती उपायही करते. होय, त्वचा मुलायम, सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी करीना स्वयंपाकघरातच उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून फेसपॅक बनवते आणि तोच फेस मास्क ती लावत असते. याबद्दल तिने अनेकदा मुलाखतींमध्येही सांगितले आहे. या फेस मास्कमुळे तिच्या चेहऱ्यावर जादुई चमक येते असंही तिने म्हटलं होतं. तो फेस मास्क म्हणजे बदाम तेल, मध आणि दही. करीनाच्या या फेसमास्कमध्ये असं काय खास आहे जे तिच्या त्वचेला तरूण आणि सुंदर ठेवते चला जाणून घेऊयात.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)


बदाम तेल

अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात असलेले व्हिटॅमिन ई केवळ निरोगी त्वचेला प्रोत्साहन देत नाही तर तिचे सौंदर्य देखील वाढवते. करीनाच्या मते, ती बदाम तेलाने तिच्या चेहऱ्यावर मालिश करते, ज्यामुळे तिची त्वचा चमकण्यास मदत होते. बदाम तेल लावल्याने त्वचा मऊ आणि कोमल होते.

मध

करीना वापरते तो आणखी एक घटक म्हणजे मध. जर तुमची त्वचा नेहमीच कोरडी असेल तर तुम्ही करीनाप्रमाणे मधाने तुमच्या त्वचेची मालिश करू शकता. ते फेस पॅकमध्ये मिसळल्याने डाग कमी होण्यास आणि तुमची त्वचा मऊ होण्यास मदत होते.

दही आणि बदाम तेलाचा फेस मास्क

करीना कपूर खान निरोगी त्वचा राखण्यासाठी अनेकदा फेस मास्क बनवते. हा फेस मास्क स्वयंपाकघरातील या तीन घटकांना एकत्र करून बनवला जातो. दही बदाम तेल अन् थोडसं मध. हा मास्क पिग्मेंटेशन सुधारण्यास मदत करतो.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.