मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. या आत्महत्येबद्दल माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी आपले सर्व नियोजित दाैरे रद्द केले आहेत. मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच कुटुंबिय वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, अगदी काही महिन्यापूर्वीच अनंत गर्जेचे लग्न थाटामाटात पार पडले. कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात असून ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत पीए म्हणून अनंत गर्जे काम करतोय. नुकताच मुलीच्या मामांनी खळबळजनक खुलासा केला. नक्की मुलीने आत्महत्या का केली? हेच त्यांनी सांगत अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले.
मुलीच्या मामाने मुंबईतील वरळी पोलिस स्टेशनमध्ये टीव्ही9 ला माहिती देताना सांगितले की, अनंत गर्जे आणि आमच्या मुलीमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. दोघांमध्ये सतत भांडणे करत. तिने याबद्दल सर्व माहिती तिच्या वडिलांना दिली. अनंत गर्जे याचे बाहेर काही संबंध होते. याबद्दल तिला कळाले. यावरून दोघांमध्ये वाद होता. मुलीने त्याला सोडून दिले आणि परत या गोष्टी करू नको म्हणून सांगतिले.
बायकोने सांगितल्यानंतरही तो सतत चॅटिंग करत होता. याबद्दल तिने आपल्या वडिलांकडे काही स्क्रीनशॉर्टही टाकले. ज्यादिवशी मुलीने आत्महत्या केली, त्यादिवशी दोघांमध्ये खूप जास्त भांडणे झाली. तिने वडिलांना फोन देखील केला. या भांडणादरम्यानच तिने स्वत:ला संपवल्याचे अनंत गर्जेने सांगितले. ज्यावेळी मुलगी स्वत:ला संपवत होती, त्यावेळी अनंत गर्जे हा घरात होता, असेही त्याने आम्हाला सांगितले.
त्यानंतर तोच आमच्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेला, तोपर्यंत तो तिथेच होता. त्यानंतर तो गेला. आमचे एकच म्हणणे आहे की, आमच्या मुलीला न्याय मिळावा. बाकी माहिती तुम्हाला मुलीचे वडील देतील. माझी बहीण मुलीचे वडील आम्ही बीडवरून आलो आहोत. अजूनही गुन्हा दाखल झाला नाही. माझी बहीण मुलीच्या जाण्याने रडत आहे. कुटुंबियांकडून ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला जात आहे.