O06201
करिअरसाठी संगणकीय ज्ञान आवश्यक
प्रा. अविनाश मांजरेकर ः तळेरे विद्यालयात संगणक प्रशिक्षण केंद्र
प्रकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २३ : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने शाळेने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व तांत्रिक उपक्रम राबवले आहेत. संगणक प्रशिक्षण केंद्रामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा सक्षम वापर करता येईल आणि ते भविष्यातील डिजिटल गरजांशी स्पर्धा करू शकतील, असे प्रतिपादन प्रा. अविनाश मांजरेकर यांनी संगणक प्रशिक्षण केंद्र उद्घाटनप्रसंगी काढले.
येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच जी. बी. प्लस टेक्नॉलॉजीज कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा चिटणीस श्रीकृष्ण खटावकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले.
खटावकर म्हणाले, ‘तळेरेसारख्या ग्रामीण भागात संगणक शिक्षणाची आधुनिक सुविधा उपलब्ध होणे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानविषयक कौशल्यांशिवाय करिअर घडवणे कठीण आहे. गणक प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या रोजगाराच्या संधींमध्येही मोठी वाढ होईल.’
या कार्यक्रमाला कणकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, युवा तालुकाध्यक्ष अण्णा खाडये, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, कासार्डे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश तिर्लोटकर, तळेरे तंटामुक्त समिती अध्यक्ष नीलेश सोरप उपस्थित होते. प्राध्यापक सचिन शेटे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. खंडमळे यांनी आभार मानले.