माधुरी दीक्षितच डॉ. नेने यांच्यासोबत लव्ह मॅरेज झालेलं? 6 महिने एकमेकांना केलेलं डेट, अभिनेत्रीनं स्वत: उघड केलं गुपित
esakal December 08, 2025 12:46 AM

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील टॉप स्टारच्या यादीत आहे. जेव्हा माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं, त्यानंतर ती सगळं सोडून विदेशात गेली होती. तेव्हा तिच्या चाहत्यांना प्रचंड वाईट वाटलं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर माधुरी पुन्हा भारतात वापस आली. त्यावेळी तिच्यासोबत दोन मुलं सुद्धा होती. परंतु नंतर तिला बॉलिवूडमध्ये स्वत: अस्तित्व निर्माण करण्यासाठी खुप वेळ लागला.

दरम्यान माधुरीचं म्हणणं आहे की, डॉ. नेने तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी ब्लेसिंग आहे. अशातच काही दिवसापूर्वी माधुरी दीक्षितने रणवीर इलाहाबादियाच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या लग्नाबाबत आणि करिअरबद्दल भाष्य केलय. मुलाखतीत बोलताना माधुरी म्हणाली की, 'जेव्हा मी लग्न करत होते, तेव्हा करिअर सोडण्याबाबत मी खूप कन्फुज होते. तेव्हा मला वाटत होतं की, एखादा वाईट पार्टनर माझं आयुष्य खराब नको करायला. माझ्या करिअरवर एकदा ब्रेक लागला की, पुन्हा मी कधी सुरु करेल. याबाबत शंका होती.'

माधुरीचा लग्नाच्या 26 वर्षानंतर मोठा खुलासा

माधुरीने मुलाखतीत बोलताना सांगितलं की, 'लग्नाबद्दल मी अनेक वेळा माझ्या बहिण-भावांशी बोलायचे. कारण माझं सिनेमा आणि अभिनयावर खूप प्रेम होतं. करिअर माझ्यासाठी खुप काही होतं. मी कधी कधी विचार करायचे की, मी कसं काय कोणासोबत राहू शकते? माझ्यासाठी कोणी चांगलं नाही. मी करिअर करताना लग्नाबाबत कधीच विचार केला नव्हता.'

View this post on Instagram
आमचं लव्ह मॅरेज होतं...

पुढे माधुरी म्हणाली की, 'मी सिनेमात काम करायचे तेव्हा डॉ. नेने यांना भेटले होते. त्यांना माझ्या कामाबद्दल काहीच आयडिया नव्हती. त्यांना हे ही माहित नव्हतं की, मी एक मोठी स्टार आहे. आम्ही जवळपास ६ महिने एकमेकांना भेटत होते. त्याचवेळी आम्हाला प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या, आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझं हे लग्न लव्ह मॅरेज होतं, ना की अरेंज मॅरेज.'

View this post on Instagram

पुढे बोलताना माधुरी हे ही म्हणाली की, 'माझं डॉ. नेने यांच्यावर प्रेम आणि इज्जत खुप आहे. आम्ही दोघे नेहमीच एकमेकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कधीच एकमेकांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही प्रत्येकवेळी एकमेकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं.'

ती घट्ट मिठी मारत किस करु लागली... दादा कोंडकेंच्या आयुष्यातील भन्नाट किस्सा माहिती? दादांची अशी अवस्था झालेली की ते...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.