सुभेदारांच्या घरात येणार छोटासा पाहुणा; 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय घडणार? 'तो' फोटो चर्चेत
esakal December 08, 2025 12:46 AM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' गेले काही वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. ही मालिका गेले तीन वर्ष टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकतेच मालिकेने १००० भाग पूर्ण केलेत. यानिमित्ताने सेटवर सेलिब्रेशनदेखील करण्यात आलं. त्यामुळे सगळेच आनंदात आहेत. अशातच मालिकेत कायम निरनिराळे ट्विस्ट येत असतात. मालिकेतील याच गमती कलाकार आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसतात. आता मालिकेतील कलाकाराने असाच एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे जो पाहून प्रेक्षक खुश झालेत. यामुळे मालिकेत नवीन पाहुणा येणार असल्याची हिंट मिळालीये.

मालिकेतील लोकप्रिय पात्र जे आधी नकारात्मक दाखवण्यात आलं होतं मात्र नंतर हे पात्र सकारात्मक दाखवण्यात आलं. ते म्हणजे अस्मिताचं. हे पात्र मालिकेत मोनिका दबडे साकारतेय. मोनिका कायमच सेटवरील फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता मोनिकाने एक फोटो शेअर केलाय. ज्यावरून मालिकेत लवकरच नवीन पाहुणा येणार असल्याचं दिसतंय. मोनिका ने काही दिवसांपूर्वीच सेट वरील एक फोटो शेअर केलेला. त्या फोटोमध्ये ती डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या गेटअप मध्ये दिसत होती. तर सुभेदारांच्या घरी किल्लेदारही आलेले.

THARLA TAR MAG

या फोटोमध्ये अस्मितांचा नवरादेखील दिसतोय. मालिकेतील डोहाळे जेवण विशेष भाग हा गुरुदत्त जयंतीला शूट केला गेला. लवकरच तो आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये अस्मिता गरोदर दाखवली असल्याने आता लवकरच मालिकेत नवीन पाहुणा दाखवला जाईल. सध्या मालिकेत महिपतचं सत्य सगळ्यांना समजलंय. आता येणाऱ्या एपिसोड मध्ये सायली अर्जुनचा वाढदिवस साजरा होणार आहे.

बऱ्याच गोष्टी घडल्या... सगळं सोडून अमेरिकेहून भारतात का परतली माधुरी दीक्षित? स्वतः सांगितलं कारण
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.