Winter Skincare: रात्री चेहऱ्याला काय लावावं? थंडीत हेल्दी स्किनसाठी असं करा स्किनकेअर
Marathi December 10, 2025 04:25 AM

आजकाल सर्वांनाच चमकदार आणि मऊ त्वचा हवी असते. यासाठी बरेच जण बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र त्यातील रासायनिक घटकांमुळे दुष्परिणाम होतात. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी रात्रीचे स्किनकेअर खूप महत्त्वाचं आहे. कारण रात्रभर चेहऱ्यावर योग्य घटक लावल्यास त्वचेला खोलवर पोषण मिळतं. त्यामुळं झोपण्यापूर्वी स्किनकेअर कसं करावं? हे जाणून घेऊया.. ( Winter Glowing Skincare for Night )

खोबरेल तेल
झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्याला खोबरेल तेल लावू शकता. हे त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि रात्रभर तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत, ज्यामुळं त्वचा निरोगी राहते. तुमच्या चेहऱ्याला खोबरेल तेलाचे काही थेंब लावा आणि हळूहळू मालिश करा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.

कूर्पन्स जेल
झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफड जेल लावू शकता. त्यातही नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे त्वचेला हायड्रेट ठेवतात. तसेच त्यामुळं मुरुमे आणि डागसारख्या समस्या कमी होतात. तुमची त्वचा चमकदार आणि मऊ ठेवण्यासाठी, रात्री तुमच्या चेहऱ्यावर कोरफड जेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. सकाळी चेहरा धुवा.

हेही वाचा: Homemade Winter Cream: गोकर्णाच्या फुलापासून घरीच बनवा नैसर्गिक विंटर क्रीम

मध
तुम्ही रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर मध देखील लावू शकता. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत ज्यामुळं त्वचेवरील मुरुमे आणि डाग काढण्यास मदत होते. यामुळं त्वचा मऊही राहते आणि ग्लो येतो.

थंडीत ग्लोइंग स्किनसाठी काय जास्त फायदेशीर?
आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, थंडीत ग्लोइंग स्किनसाठी पपईची पेस्ट, मध, लिंबाचा रस आणि मुलतानी मातीचा फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक लावण्यासाठी चेहरा स्वच्छ करा. नंतरपेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. फेस पॅक २० ते ३० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल, चेहरा तेजस्वी दिसेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.