शिवगंध प्रतिष्ठानच्या शिबिरात
२१८ दात्यांनी केले रक्तदान
लांजा, ता. ९ः शिवगंध प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २१८ दात्यांनी रक्तदान केले. शिवगंध प्रतिष्ठानच्यावतीने कै. अद्वैत जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे शिबिर घेतले.
शहरातील संकल्पसिद्धी सभागृहात याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेतर्फे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देत गौरव करून आभार व्यक्त करण्यात आले. या शिबिराला ५०० हून अधिक लोकांनी भेट दिली. रक्तदात्यांच्या या उत्साहामुळे अनेक गरजूंना जीवनदान मिळणार आहे. त्यामुळे यापुढेही आपले हे सामाजिक कर्तव्य असेच चालू ठेवण्याचा संकल्प शिवगंध प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवगंध प्रतिष्ठानच्या राजू जाधव व सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.