Pandharpur Crime : पंढरपुरात शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह पाच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत; घटनेनंतर तालुक्यात वेगळीच चर्चा
esakal December 10, 2025 10:45 AM

पंढरपूर (सोलापूर) : कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एका शेततळ्यात पती- पत्नीसह एका पाच वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू (Pandharpur Case) झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ८) दुपारी चारच्या सुमारास घडली. ही दुर्दैवी घटना घडली की आत्महत्या, याबाबत पोलिस (Police) तपास करीत आहेत. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विजय राजकुमार लोंढे (वय ३०), प्रियांका विजय लोढे (वय २८) आणि प्रज्वल विजय लोंढे (वय ५, रा. पाटखळ, ता. मंगळवेढा) अशी मृतांची नावे आहेत. लोंढे पती-पत्नी आपल्या लहान मुलासह कोर्टी परिसरात आले होते. दरम्यान, कोर्टी येथील सिंहगड कॉलेज परिसरातील डॉ. निखिल लाड यांच्या शेततळ्यात ही घटना घडली आहे.

Baby Suffocation Case : लग्नाच्या चार वर्षांनी बाळाचा जन्म; 23 व्या दिवशी बेडमध्ये घडलं आक्रित, आई-वडिलांच्या 'त्या' एका चुकीनं...

स्थानिक लोकांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना खबर देण्यात आली. त्यानंतर तळ्यात बुडालेल्या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली की आत्महत्या, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लोंढे कुटुंबीय या परिसरात का आले होते? याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, वीरसेन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.