09472
विज्ञान प्रदर्शनात
राऊळ यांचे यश
सावंतवाडी ः संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक उमेश राऊळ यांच्या माध्यमिक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य ‘गंमत प्रकाशाची’ या प्रतिकृतीला तालुक्यात दुसरा क्रमांक आला. नेमळे विद्यालयात रुजू झाल्यापासून अठरा वर्षांत त्यांनी विज्ञान प्रदर्शनात अकरा वेळा बक्षिसे मिळविली आहेत. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. तसेच शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेत राऊळ यांनी जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. त्यांची विभागस्तरावर निवड झाली आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, सर्व पदाधिकारी, प्राचार्य आर. के. राठोड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.