जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
वाशी (बातमीदार)ः ऐरोली सेक्टर १४ येथील नामकरण झालेल्या चौकात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१व्या जयंतीनिमित्त श्री संताजी प्रगती मंडळ, नवी मुंबई यांच्या वतीने सोमवारी (ता. ८) सकाळी १० वाजता कार्यक्रम पार पडला. या वेळी शहरातील तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती नवी मुंबई महापालिका अशोक पाटील उपस्थित होते. त्यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ, हार अर्पण करून अभिवादन केले.