Corona Remedies IPO : पहिल्या दिवशी 67%, दुसऱ्या दिवशी 500% सबस्क्रिप्शन! तर GMP 28% पर्यंत; हा IPO घ्यावा की नाही?
esakal December 10, 2025 09:45 AM

Corona Remedies : फार्मा क्षेत्रातील कोरोना रेमेडीज लिमिटेडच्या IPO चा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत IPO तब्बल 4.71 पट सबस्क्राइब झाला आहे, असे NSE डेटानुसार दिसून आले. त्यामुळे Meesho नंतर या आयपीओ ला देखील बाजारात चांगलीच मागणी दिसत आहे.

8 डिसेंबरला पहिल्या दिवशी NSE च्या माहितीप्रमाणे, कोरोना रेमेडीज IPO 62% भरला. एकूण 45,71,882 शेअर्सच्या तुलनेत 28,17,234 शेअर्ससाठी अर्ज आले.

10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल


Corona Remedies IPO 8 डिसेंबर रोजी खुला झाला असून 10 डिसेंबर, म्हणजेच बुधवारपर्यंत गुंतवणूकदार अर्ज करू शकतात. IPO चे अलॉटमेंट 11 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे आणि 15 डिसेंबर शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणार आहे. हा IPO सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांवर लिस्ट होणार आहे.

किमान ₹15 हजारांची गुंतवणूक आवश्यक

कंपनी या IPO मधून एकूण ₹655.37 कोटींची उभारणी करणार आहे. हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) प्रकारचा इश्यू आहे, ज्यामध्ये 61.71 लाख शेअर्स विकले जात आहेत. IPO चा प्राइस बँड प्रति शेअर ₹1,008 ते ₹1,062 आहे. एका लॉटमध्ये 14 शेअर्स आहेत आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक ₹14,868 इतकी आहे.

BHIM UPI Cashback: BHIM ॲपवर मिळतोय 100% कॅशबॅक! पैशांची होईल जबरदस्त बचत; ऑफर फक्त काही दिवसांसाठी; असा मिळवा फायदा! GMP 28% पर्यंत


लिस्टिंगपूर्वी अनलिस्टेड मार्केटमध्ये या शेअर्सची मागणी जोरात दिसत आहे. अनलिस्टेड मार्केटच्या एका वेबसाइट्सनुसार, आज Corona Remedies IPO चे ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) ₹290 आहे. म्हणजेच, ग्रे मार्केटमध्ये हा शेअर इश्यू किंमतीपेक्षा ₹290 जास्त दराने ट्रेड होत आहे.

याचा अर्थ असा की ग्रे मार्केटमध्ये या शेअरची किंमत साधारण ₹1,352 आहे, जी IPO च्या ₹1,062 किंमतीपेक्षा सुमारे 27.31% जास्त आहे.

Ayushman Card : 5 लाखांचा मोफत आरोग्य विमा; कोणत्या आजारांवर आणि वर्षभर किती वेळा मोफत उपचार? नियम जाणून घ्या आणि आजच नोंदणी करा! तज्ञांच मत

जियोजीत इन्वेस्टमेंट्स लिमिटेडच्या मते, कोरोना रेमेडीजचा IPO दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. 2004 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी अहमदाबादमध्ये असून तिच्याकडे 71 उत्पादनांचे पोर्टफोलिओ आहे. भारतीय औषध बाजार सध्या 2.3 लाख कोटींवर पोहोचला असून पुढील काही वर्षांत तो 3.5 लाख कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांमुळे औषधांची मागणी वाढत आहे आणि कंपनीकडे मजबूत डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आणि सातत्याने मिळणारे चांगले आर्थिक निकाल यामुळे हा IPO आकर्षक मानला जात आहे.

(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. तुमच्या कोणत्याही नफा किंवा तोट्यास सकाळ ऑनलाईन जबाबदार राहणार नाही.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.