कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने फूटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम आज पोलिस बंदोबस्तात सुरू केली. सीपीआर चौक ते खानविलकर पंपापर्यंतच्या रस्त्यावरील सामायिक जागेत व्यवसायासाठी वापरली जात असलेली १२ मोठी शेड, बांधकामे जमीनदोस्त केली.
तसेच फूटपाथवरील ७ टपऱ्या, दोन हातगाड्या, छपऱ्यांवरही कारवाई केली. रस्त्यांच्या कामाबाबतच्या जनसुनावणीदरम्यान सर्किट बेंचने फूटपाथवरील अतिक्रमणांविरोधात कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेकडून कारवाई सुरू केली.
Kolhapur News : संच मान्यतेतील जाचक अटी रद्द न झाल्यास व्यापक आंदोलन; पाचशेहून अधिक शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयात धरणेपहिल्या टप्प्यात सीपीआर चौकापासून कारवाईला प्रारंभ केला. दोन जेसीबी, दोन डंपर, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी मोहिमेत सामील होते. चौकापासून छोट्या छपरीपासून सुरुवात केली. करवीर पंचायत समितीच्या आवाराजवळील केबिनपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर १२ मोठी शेड सामायिक जागेत उभी केली होती.
त्यामध्ये छोटे कॅफे, स्टुडिओ, तसेच विविध व्यवसाय चालवले जात होते. त्यांना यापूर्वीच नगररचना विभागाने नोटीस दिल्या होत्या, तरीही ती शेड हटवली नसल्याने आज जेसीबीद्वारे कारवाई सुरू केली.
Kolhapur Chandoli News : चांदोली प्रकल्पग्रस्तांसाठी मोठा निर्णय; कलम ११ ते १४ लागू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना महिन्यात अहवाल देण्याचे आदेशत्यावेळी महिलांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई पूर्ण केली. काही शेडधारकांनी पाठीमागील इमारतीचा आधार घेऊन पक्के बांधकामच केले होते, तेही काढले.
त्यानंतर खानविलकर पेट्रोल पंपापर्यंतच्या फूटपाथवरील अनधिकृत सात टपऱ्या, दोन हातगाडया, छपऱ्यांवरही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी जैन बोर्डिंग परिसरात पाहणी केली.
रस्त्यांवरील अनधिकृत शेड, फूटपाथवर बांधकाम साहित्य, मातीचे ढिगारे, तसेच बस स्टँड, धार्मिकस्थळे, शाळा, रुग्णालये, न्यायालये, सरकारी कार्यालये अशा गर्दीच्या ठिकाणी किरकोळ व्यवसायाला बंदी असल्याचे सांगत महापालिकेने फेरीवाले, हातगाडीचालक, इतर छोट्या विक्रेत्यांना साहित्य तत्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. उद्याही कारवाई सुरू राहणार असून, साहित्य जप्त करण्यात येणार आहे.
अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण धनवाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, एन. एस. पाटील, सुरेश पाटील, निवास पोवार, महादेव फुलारी, विलास साळोखे कर्मचारी उपस्थित होते.
शाहू टोल नाक्यापर्यंतचा रस्ता प्रथमसीपीआर चौकापासून खानविलकर पंप, धैर्यप्रसाद कार्यालय, कावळा नाका, शाहू टोल नाका या मोठ्या रस्त्यावर प्रथम महापालिकेने कारवाई करण्याचे ठरवले आहे. हा रस्ता अनेक व्हीआयपींसाठी वापरला जात आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रथम कारवाई केली जात आहे.