Ayushman Bharat scheme : भारत सरकारने गरीब आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मोफत किंवा किफायतशीर आरोग्य सेवा देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळतो. यासाठी प्रत्येकाला आयुष्मान कार्ड बनवावे लागते. ही योजना भारतातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनांपैकी एक मानली जाते.
आयुष्मान कार्ड कधी सुरु झाले?आयुष्मान कार्ड साल 2018 मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत सुरु झाले. या कार्डच्या माध्यमातून नागरिक देशभरातील हजारो सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत घेऊ शकता. हे कार्ड बनवण्यासाठी कोणत्याही एजंटची किंवा लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जाते.
एक वर्षात किती वेळा उपचार करता येतात?या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे फ्री उपचार संपूर्ण कुटुंबासाठी लागू होतात.
उदाहरणार्थ, जर कुटुंबात 6 सदस्य असतील, तर हे 5 लाख रुपये सर्व सदस्य मिळून वापरू शकतात.
तुम्ही वर्षभरात कितीही वेळा उपचार करून घेऊ शकता, जोपर्यंत तुमच्या कुटुंबाची 5 लाख रुपयांची मर्यादा संपत नाही.
या योजनेअंतर्गत जटिल शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांवर उपचार करता येतात, जसे की;
डबल वाल्व रिप्लेसमेंट
कैरोटिड एंजिओप्लास्टी
प्रोस्टेट कॅन्सर
स्कल बेस सर्जरी
हार्ट वाल्व रिप्लेसमेंट
पेसमेकर इम्प्लांटेशन
रेनल ट्रान्सप्लांटेशन
कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन
मात्र, नियमित OPD किंवा साध्या तपासण्या (जसे की डॉक्टरची सल्ला, एक्स-रे, रक्त तपासणी, रूटीन चेकअप) या योजनेअंतर्गत फ्री येत नाहीत.
Ayushman App फोनवर डाउनलोड करा. (सरकारी ऐप)
भाषा निवडा.
लॉगिन करा आणि Beneficiary वर क्लिक करा.
कॅप्चा आणि मोबाईल नंबर भरा.
Search for Beneficiary पेज उघडेल, त्यात स्कीममध्ये PM-JAY निवडा.
राज्य आणि जिल्हा निवडा, आपला आधार नंबर टाका.
कार्ड नसलेल्या सदस्यांसाठी Authenticate वर क्लिक करा, OTP भरा, फोटो क्लिक करा.
मोबाईल नंबर व नातेसंबंध भरा.
e-KYC पूर्ण केल्यावर फॉर्म सबमिट करा.
सात दिवसात वेरिफिकेशन नंतर कार्ड डाउनलोड करा.