घरात काहीही कारण नसताना सतत भांडण होतात? मग उत्तर दिशेला ठेवा ही एक छोटी गोष्ट
Tv9 Marathi December 13, 2025 09:45 AM

घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील तर त्याचा प्रचंड नकारात्मक परिणाम हा त्या कुटुंबातील व्यक्तींवर होत असतो. अनेक घरांमध्ये काहीही कारण नसताना किंवा अगदी छोट्या गोष्टींवरून देखील दररोज भांडणं होतात. घरामध्ये असलेला वास्तुदोष देखील अशा भांडणासाठी कारणीभूत असू शकतो, त्यामुळे हा वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. जर घरात सतत भांडणं होत असतील तर त्यावर फेंगशुईमध्ये देखील काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फेंगशुई हे चीनी वास्तुशास्त्र आहे. तुम्ही फेंगशुईमध्ये सांगितलेल्या नियमांचं पालन करून घरातील असे दोष दूर करू शकतात, त्यातीलच काही उपायांबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

घरामध्ये ठेवा या वस्तू

जर तुमच्या घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात पटत नसेल, नेहमी भांडणं होत असतील, तर एक छोट्या उपायामुळे तुम्ही हा नकारात्मक प्रभाव दूर करू शकता. त्यासाठी तुम्हाला आवश्यकता असेल ती म्हणजे पाण्याने भरलेल्या एका खोल ताटलीची, आणि फेंगशुईच्या कासवाची, तुम्ही कासवाला ज्या ताटलीमध्ये ठेवणार आहात, ती ताटली तुम्ही कोणत्याही धातुची घेऊ शकतात, तसेच फेंगशुईचं कासव तुम्हाला बाजारात कुठेही सहज उपलब्ध होईल. त्या कासवाला तुम्ही या ताटलीमध्ये ठेवा आणि हे पाण्यानं भरलेल्या ताटलीमधील कासव घराच्या उत्तर दिशेला ठेवा. यामुळे घरात शांती राहील, घरातील सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल आणि घरात पॉझिटिव्ह उर्जेचा संचार होईल. यामुळे घरात होणारे वादविवाद कमी होतील.

या गोष्टी देखील लक्षात ठेवा

फेंगशुई शास्त्रानुसार जर तुमच्या घरात कोणतंही तुटलेलं, फुटलेलं सामान असेल तर ते कधीही घरात ठेवू नका, ते फेकून द्या, तसेच घरात बंद पडलेली घड्याळं किंवा इतर इलेक्ट्रॉनिकचं बंद पडलेलं सामान देखील ठेवू नका, तसेच घराचा मुख्य दरवाजा बंद करताना किंवा उघडताना त्याचा फार आवाज होणार नाही याची देखील काळजी घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.