Top Low Investment Business Ideas for Women: आजकाल अनेक लोक घरातूनच विविध व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करत आहेत. विशेषतः बऱ्याच महिलांना ऑफिसची धावपळ नको असते, त्यामुळे त्यांना घरातून काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते.
नोकरीच्या ताणापेक्षा घरच्या व्यवसायातून आरामात पैसे कमवता येतात, आणि कुटुंबालाही आर्थिक आधार मिळतो. चला तर जाणून घेऊया घरबसल्या कोणते व्यवसाय करता येतील जेणे करून कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळेल.
Paush Amavasya 2025: पौष अमावस्या कधी आहे? जाणून घ्या 'या' दिवसाचे विशेष महत्त्व घरगुती बेकारी आणि केक व्यवसायसण, वाढदिवस, लग्न किंवा ऑफिसच्या कार्यक्रमांसाठी केक गरजेचे असतात. घरबसल्या केक किंवा बेकारी प्रॉडक्ट बनवून विकणे हा व्यवसाय सुरुवातीला कमी गुंतवणुकीत सुरु करता येतो. चव आणि गुणवत्ता चांगली ठेवली तर ग्राहक आपोआप वाढतात.
बुटीक किंवा फॅशन शॉपबुटीक व्यवसाय महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. घरबसल्या बुटीक सुरु करून कपडे, शर्ट साडी किंवा बाळसणारा लहान फॅशन स्टुडिओ चालवता येतो. ग्राहकांच्या पसंतीनुसार ऑर्डर घेऊन कपडे तयार करणे किंवा सिलाईचे छोटे वर्कशॉप देणे हा व्यवसाय गावठी आणि तालुका स्तरावरही यशस्वी ठरतो.
ऑनलाईन ट्युशन आणि शिकवणीघरगुती शिकवणी हा बेस्ट आणि क्लासिक व्यवसाय आहे, पण तंत्रज्ञानामुळे आता ऑनलाईन ट्यूशन खूप लोकप्रिय झाला आहे. महिलांना आवडीच्या विषयांचे शिक्षण देऊन घरबसल्या कमाई करता येते. इंग्रजी, गणित, विज्ञान किंवा कला- संगीत यासारखे कोणतेही कौशल्य वापरून पैसे कमवता येतात.
CBSE Class 10 Board Exam: सीबीएसईने 10वीच्या बोर्ड परीक्षेबाबत मोठा बदल! जाणून घ्या काय आहेत नवीन नियम... होम फूड व्यवसाय आणि टिफिन सेवाअन्न बनवायला आवडणाऱ्या महिलांसाठी टिफिन सेवा किंवा घरगुती खानावळ हा व्यवसाय उत्तम आहे. विद्यार्थी, नोकरदार किंवा व्यस्त कुटूंबासाठी पौष्टिक जेवण तयार करून नियमित पुरवठा दिला तर व्यवसाय सातत्याने वाढतो.