“बिग बॉस 19” हा रिअॅलिटी शो नुकताच संपला आहे. या सीझनची ट्रॉफी गौरव खन्नाने जिंकली आहे. शो आणि पार्टीनंतर सर्व स्पर्धक त्यांच्या कामावर परतले आहेत. बरेचसे स्पर्धक जे की मुंबईतील नव्हते ते आता आपापल्या गावी, आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यातीलच एक सदस्य म्हणजे मृदुल तिवारी. मृदुल देखील शो संपल्यानंतर आपल्या गावी गेला आहे. त्याने त्याच्या गावातील मुलांना एक खास भेटही दिली. याची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मृदुल सर्व मुलांना पिझ्झा देताना दिसत आहे.
मृदुल तिवारीआणि त्याची टीम गावात पोहोचते जिथे खूप मुले आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मृदुल सर्व मुलांना पिझ्झा देताना दिसत आहे. त्यानंतर, त्याने मुलांना नोटबुक, पेन आणि पेन्सिल देखील दिली. कारण अभ्यासही तेवढाच महत्वाचा असल्याचं तो सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत मृदुलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “त्या मुलांना पिझ्झा आवडतो आणि मलाही. आणि तुम्हालाही? मला फारसे औपचारिक शिक्षण मिळाले नाही, पण तरीही मी स्वतःला सुधारण्याचा आणि दररोज शिकण्याचा प्रयत्न करतो. शिक्षण हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे.”
चाहत्यांचा मृदुलवर प्रेमाचा वर्षाव
हा व्हिडीओ पाहून मृदुलचे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एकाने म्हटले, “निःस्वार्थपणे केलेले हे उत्कृष्ट काम अत्यंत प्रेरणादायी आहे. तुमचे प्रयत्न आणि सकारात्मक विचार लोकांना नवीन दिशा आणि आशा देत आहेत.” दुसऱ्याने म्हटले, “एकच हृदय आहे, तू किती वेळा मन जिंकशील मित्रा?” तर एका चाहत्याने म्हटले, “खूप सुंदर.” अशा अनेक कमेंट्स येत असून चाहत्यांनी मृदुलचे कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
A post shared by MRIDUL TIWARI (@themridul_)
‘बिग बॉस 19’ च्या मेकअर्सवर नाराजी
दरम्यान मृदुलला जेव्हा कमी वोटमुळे घराबाहेर जाव लागलं होतं तेव्हा त्याने ‘बिग बॉस 19’ च्या मेकअर्सवर नाराजी व्यक्त केली होती. ‘बिग बॉस 19’मधून ज्या पद्धतीने बाहेर काढण्यात आलं त्यामुळे तो खूप निराश झाला होता. या संदर्भात तो म्हणाला होता की “मला ज्या पद्धतीने बाहेर काढण्यात आले त्यामुळे मी खूप निराश झालो. ‘जनता का फैसला’ सत्रात प्रेक्षकांनी माझी निवड केली. जर प्रेक्षकांनी एखाद्याची निवड केली असेल, तर 50 जणांना मिळालेल्या मतांच्या आधारे तुम्ही त्याला कसे बाहेर काढू शकता? ते इतर स्पर्धकांसाठीही हीच युक्ती वापरू शकले असते. नोएडा आणि उत्तर भारतातील माझ्या चाहत्यांवर हे अन्याय्य आहे जे प्रत्यक्षात मला मतदान करतात.” असं म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती.