Nitish Kumar Viral Video : बिहारमध्ये नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महागठबंधनला अभूतपूर्व यश मिळाले. निवडणूक जिंकल्यानंतर आता संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले आहेत. त्यांची सध्या भाजपासोबत युती आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेले नितीश कुमार हे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांची काही विधानं चांगलीच वादग्रस्त ठरतात. तर कधी-कधी त्यांनी केलेल्या एखाद्या कृतीचीही तेवढीच चर्चा होत आहे. सध्या मात्र नितीश कुमारच्या एका कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. बिहारमधील विरोधकांनी नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी एका मुस्लीम महिला डॉक्टरने लावलेला हिजाब स्वत:च्या हातांनी काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांनी सोमवारी (15 डिसेंबर) एकूण 1283 आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र दिले. त्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नितीश कुमार यांनी काही डॉक्टरांना मंचावर बोलवून नियुक्तीपत्र सोपवले. यामध्ये नुसरत परवीन या मुस्लीम महिला डॉक्टरांचाही समावेश होता. नितीश कुमार यांनी याच महिला डॉक्टरचा हिजाब हातांनी ओढला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होत असून नितीश कुमार यांच्यावर टीका केली जात आहे.
या कार्यक्रमात डॉक्टर नुसरत परवीन नियुक्तीपत्र घेण्यासाठी मंचावर गेल्या. त्यानंतर नितीश कुमार यांनी नियुक्तीपत्र देण्याआधी परवीन यांना तुम्ही डोक्यावर काय लावले आहे, असे विचारले. या प्रश्नाचे उत्तर म्हणून परवीन यांनी हा हिजाब आहे, असे सांगितले. त्यानंतर नितीश कुमार यांनी नियुक्तीपत्र देण्याआधी आपल्या हातांनी नुसरत परवीन यांच्या चेहऱ्यावरील हिजाब स्वत:च्या हातांनी ओढला. त्यानंतर परवीन यांचा चेहरा दिसायला लागला. हा सर्व प्रकार पाहून परवीन थोड्याशा गोंधळल्या. तर तिथे उपस्थितांमध्ये हशा पिकला. परवीन यांचा हिजाब ओढल्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
यह क्या हो गया है नीतीश जी को?
मानसिक स्थिति बिल्कुल ही अब दयनीय स्थिति में पहुंच चुकी है या नीतीश बाबू अब 100% संघी हो चुके हैं?@yadavtejashwi #RJD #bihar #TejashwiYadav pic.twitter.com/vRyqUaKhwm— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) December 15, 2025
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाने संताप व्यक्त केला आहे. या पक्षाने आपल्या अधिकृत एक्स खात्यावर नितीश कुमार यांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच नितीश कुमार यांना नेमके काय झाले आहे, असा सवाल केलाय. नितीश कुमार आता 100 टक्के संघी झाले आहेत का? असा बोचरा प्रश्नही आरजेडीने केला आहे.