गाजरात भरपूर बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे दृष्टी सुधारते आणि रात्रीची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. गाजरचा हलवा शरीराला आवश्यक ऊर्जा देतो, ज्यामुळे दैनंदिन कामे करण्यासाठी ताकद मिळते.
गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घ्या... गाजर किसलेले – 2 कप, दूध – 1½ कप, साखर – ½ कप (चवीनुसार), तूप – 2 ते 3 टेबलस्पून, वेलची पावडर – ½ टीस्पून, काजू, बदाम, मनुका आवश्यक असल्यास तुम्ही घेऊ शकता.
गाजरचा हलवा बनवताना कढईत 1 टेबलस्पून तूप घ्या. त्यात किसलेले गाजर टाका व 4–5 मिनिटे मध्यम आचेवर परतवा. त्यात दूध घाला आणि गाजर मऊ होईपर्यंत शिजू द्या... या प्रक्रिये दरम्यान दूध आटत जाईल.
दूध जवळजवळ आटल्यावर साखर घाला आणि नीट ढवळा. साखर घातल्यावर पुन्हा थोडे पाणी सुटेल, ते आटू द्या. आता उरलेले तूप, वेलची पावडर आणि सुका मेवा घाला. हलवा कढईच्या कडांपासून सुटू लागला की गॅस बंद करा.
गाजर हलवा बनवताना दूध ऐवजी मावा वापरल्यास चव अजून छान लागेल.गाजर लाल आणि गोड असतील तर हलवा अधिक चविष्ट होतो. त्यामुळे बाजारातून गाजर खरेदी करताना लाल गाजर पाहून घ्या...