झी मराठी वाहिनीने नवीन कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे.
प्रोमो पाहून निलेश साबळे-भाऊ कदम पुन्हा एकत्र दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
निलेश साबळे-भाऊ कदम यांनी आजवर आपल्या कॉमेडीने चाहत्यांना हसवले आहे.
2025 संपायला आता काही दिवस बाकी आहेत. 2026 च्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर झी मराठी वाहिनीने नवीन कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ज्याचा प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच सोशल मीडियावर डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) पुन्हा एकत्र काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
View this post on Instagram
झी मराठी वाहिनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोन कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. मात्र त्यांचे चेहरे दिसत नाही आहे. व्हिडीओच्या शेवटी "आता COMEBACK होणार" असे लिहिलं आहे. व्हिडीओतील कलाकारांची पाठमोरी झलक पाहून ही जोडी दुसरी-तिसरी कोणी नसून निलेश साबळे आणि भाऊ कदम असल्याचे चाहते बोलत आहेत.
व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "बाकीच्यांचं COMEBACK होणार असेल २०२६ वर्षात, आपलं COMEBACK २०२५ मध्येच होणार!'उगाच' नाही....बघाच, लवकरच..." 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शो मधून निलेश साबळे आणि भाऊ कदम प्रेक्षकांच्या घराघरात पोहचले. त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अभिनयाचे आणि कॉमेडीचे चाहते दिवाने आहेत.
View this post on Instagram
2025 मध्ये 'चला हवा येऊ द्या'चा दुसरा भाग सुरू झाला. मात्र यात प्रेक्षकांचे आवडते कलाकार निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडे भाग होऊ शकले नाही, त्यामुळे चाहते खूपच नाराज झाले. त्यामुळे आता या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता हे कालाकार 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार की त्यांचा नवीन कार्यक्रम येणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'उगाच' हा शब्द हायलाइट दिसत आहे. तसेच खूप काळापासून झी मराठीच्या 'उगाच अवॉर्ड'ची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे निलेश साबळे आणि भाऊ कदम या अवॉर्ड शोमध्ये झळकू शकतात असे बोले जात आहे. पुरस्कार सोहळ्याचे होस्टिंग निलेश साबळे आणि भाऊ कदम करणार असतील. मात्र अद्याप कोणताही अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे चाहते नेमकं काय, जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
Lionel Messi Video : लिओनेल मेस्सीला पाहायला आलेले चाहते अजय देवगन अन् टायगर श्रॉफला पाहून संतापले, स्टेडियमवर उडाला गोंधळ