बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख कायमच चर्चेत असतो. रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीजन 6 ला होस्ट करणार आहे. सलमान खानने याबाबतची घोषणा केली. रितेश देशमुख याने बिग बॉस 5 ला होस्ट केले होते. विशेष म्हणजे बिग बॉस 5 ने मोठा धमाका केला. रितेश देशमुख याचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. त्या सीजनला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. सलमान खानच्या स्टाईलमध्ये रितेश देशमुखने मराठी बिग बॉसला होस्ट केले. शोच्या निर्मात्यांनी रितेश देशमुख हाच सीजन 6 ला होस्ट करणार असल्याचे स्पष्ट केले. बिग बॉस मराठीच्या सीजनला अगोदर अभिनेते महेश मांजरेकर होस्ट करत होते. मात्र, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे रितेश देशमुखला संधी मिळाली आणि रितेशने संधीचे नक्कीच सोने केले.
रितेश देशमुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना तो दिसतो. आपल्या पूर्ण कुटुंबासोबतचे सणावारचे फोटोही शेअर करते. रितेश देशमुख याने त्याच्या दोन्ही मुलांना अत्यंत चांगले संस्कार दिले आहेत. पापाराझी यांना बघताच रितेश देशमुखचे दोन्ही मुले हात जोडतात आणि शांतपणे उभा राहतात. फक्त रितेश देशमुख याचेच मुले नाही तर त्याच्या भावांचेही मुले फोटोसाठी पोझ देताना दिसतात.
आता नुकताच रितेश देशमुख हा एका कार्यक्रमात पोहोचला होता. या कार्यक्रमात रितेश देशमुख याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया उपस्थित नव्हती. मात्र, यावेळी रितेश देशमुख याचे दोन्ही मुले त्याच्यासोबत होती. पापाराझींना फोटोसाठी पोझ देत असताना रितेशच्या मोठ्या मुलाच्या शूजचे लेस निघाली. सुरूवातीला रितेशचे याकडे लक्ष नव्हते. मुलाने रितेश देशमुखला सांगितले की, शूजची लेस निघाली.
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
यानंतर थेट कॅमेऱ्यांसमोर रितेश देशमुख खाली वाकला आणि आपल्या मुलाच्या शूजची लेस बांधली. आता रितेश देशमुख याचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. रितेश देशमुख याच्यावर काैतुकांचा वर्षाव केला जात आहे. किती मोठा स्टार असून याने कोणालाही न सांगता स्वत:च्या लेकाची लेस स्वत: बांधली. रितेश देशमुख कायमच त्याच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.